देवेंद्र फडणवीस फार सज्जन माणूस : चंद्रकांत पाटील

विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार ठरवताना काय घडामोडी झाल्या, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले विश्लेषण
chandrakant patil devendra fadnavis
chandrakant patil devendra fadnavis

पुणे : ``देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात, ते चुकीचे असून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी आम्ही खूप मनापासून प्रयत्न केले. मात्र केंद्रीय पातळीवर कठोरपणे पर्यायी नावे द्यायला सांगितल,` असा खुलासा करत 'देवेंद्र फडणवीस फार सज्जन आहेत. ते काही बोलत नाहीत, म्हणून काहीही बोलावे, हे बरोबर नाही', असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

एकनाथ खडसे यांनी उघडपणे बोलून दाखवलेली नाराजी आणि भाजपची अंतर्गत धुसपुस या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याशी साम टीव्हीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी संवाद साधला. त्यावेळी पाटील बोलत होते.

खडसे, पंकजा आणि बावनकुळे यांच्या उमेदवारीबाबत केंद्रीय पातळीवर काय विचार झाला असेल, हे माहिती नाही, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, 'आमचा काही वैचारिक अजेंडा आहे. हिंदू आणि भारतीय विचारसरणी हाही अजेंडा आहे. त्यानुसार घरातील भांडणे घरातच मिटवायची असतात. आपल्या घरात भांडण झाले तर ते बाहेर सांगायचे नसते. आपल्यापेक्षा इतरांना मोठे करण्यात आनंद मानायचा. शिवाय एखादी गोष्ट मान्य नसेल तर ती वरिष्ठांना सांगायची असते. हाच अजेंडा आमलात आणण्यासाठी केंद्रीय पातळीवर कठोर होत असेल'. “पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं असंच माझं व देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानं तिकिट नाकारलं असल्याचे पाटील म्हणाले.

'आमच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असून आम्ही कोणतीही जात-पात मानत नाही. परंतु राजकीय स्थितीत सामान्यांना वाटत असते, की माझा माणूस तिथे आहे का? तरच तो पक्ष आपला. त्यामुळे उमेदवारी देताना समतोल हा ठेवावाच लागतो. तसेच उमेदवारी देतानाही आम्ही कर्तृत्वावरच सिलेक्शन केले आहे', असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com