रायगड : "मुबंई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार का असा प्रश्न उपस्थित केला असता मुबंई महानगरपालिकेची निवडणुक भाजप स्वबळावर लढेल," अशी सूचक प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रविवारी ते रायगड जिल्हा दौऱ्यावर होते. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे कोळी महासंघाच्या वतीने मच्छिमारांना जाळी, शितपेट्या, टब, बोटींचे नुकसान झालेल्या मच्छिमारांना धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, आमदार रविंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
"आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे," असं फडणवीस यांनी नुकतेच सांगितलं होत.
जातीत पुन्हा घेण्यासाठी एक लाख रुपये दंड, पाच बोकड व दारू देण्याचे फर्मान #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #FivePerson #Arrested #ExpelledFamily #Caste https://t.co/WOTo5yDTYO
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 6, 2020
हेही वाचा : दिल्ली आंदोलनात शेतकरी कमी बाजार समितीचे दलालच जास्त! - सदाभाऊ खोत
मुंबादेवी : दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकात शेतकरी कमी आणि बाजार समित्यांशी संबंधित दलालच जास्त आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यात शेतकरीहितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर काल सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाएल्गार आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, युवा नेते सागर खोत, पक्षप्रवक्ते लालासो पाटील, भानुदास शिंदे, जितू आडिलकर, सुहास पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष रवींद्र खोत, महिला उपाध्यक्षा नीता खोत, एन. डी. चौगुले तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

