पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे आहे? फडणवीसांनी दिले हे उत्तर 

वाढदिवसा निमित्ता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता.
 Devendra Fadnavis, Pritam Munde .jpg
Devendra Fadnavis, Pritam Munde .jpg

पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणामध्ये भाजपच्या राज्यातील नेत्यांचा उल्लेख टाळला होता. तर भाजपच्या ओबीसी परिषदेलाही पंकजा गैरहज राहिल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यावर फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला. (Devendra Fadnavis said about Pankaja Munde) 

यावेळी फडणवीस यांना विचारले होते की पंकजा मुंडे आणी तुम्ही राज्यामध्ये बहिण-भावाप्रमाणे फिरलात आता हे नाते कसे आहे, त्यावर फडणवीस म्हणाले, ''राजकारण करत असताना मला गोपीनाथ मुंडे साहेबांकडून खुप शिकायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी माझे एक भावनीक नाते आहे. आजही ते नाते तसेच आहे. त्यामुळे ते नाते राजकारणा पलिकडचे आहे. त्या नात्यामध्ये कधीही-काहीही कमी अधीक होईल, असे मला वाटत नाही. पूर्वीप्रमाणेच बहीण-भावंडांप्रमाणे नाते आजही कायम'', असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसही नुकताच झाला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का, त्यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारल तर त्यांना जास्त आनंद होईल. त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकली आहे. पण आता त्याबद्दल काय सांगायचे? पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असे विचारल्यानंतर राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी उत्तर देणे टाळले.

वाढदिवसा निमित्ता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या लेखाच्या संदर्भानेच फडणवीस यांना विचारण्यात आले की, तुमचे आणि अजित पवार यांचे नाते कसे आहे? त्यावर फडणवीस म्हणाले, प्रश्न नात्याचा नाही. वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता एवढी वर्षे अजित पवार राज्याच्या राजकारणात आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांचे काही ना काही कर्तृत्व आहेच. 

अनेक वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचे दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. मात्र, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मान्य करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला होता. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटते त्याबद्दल लेख लिहिला. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com