पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया   - Devendra Fadnavis said about Pankaja Munde  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधला होता. 

मुंबई :  माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट मोदी-शाहांचे नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis said about Pankaja Munde) 

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केले, तुम्ही ते भाषण ऐकले का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना, ''पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही'', असे फडणवीस म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : बीएचआर घोटाळा; २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन

पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या विषयी अधिक बोलणे फडणवीसांनी टाळले. 

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?  

दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मंत्रीपदाबाबत भाष्य केले. पंकजा म्हणाल्या, गेल्या आठ दिवसांत मला अनेक लोक भेटले. माझा बीडमध्ये पराभव झाल्यानंतर अनेकांनी आम्ही राजीनामा देतो; आमच्या जागी पंकजा मुंडे यांना निवडणूक लढवायला लावा, अशी विनंती अनेकांनी मला केली होती. पंकजा मुंडेमुळे आम्ही निवडून आलो, असे सांगणारे अनेक आहेत. पण मी पदाची लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही. मला खुर्चीची अपेक्षा नाही. मी असुरक्षित नाही आणि मला कुणाला संपवून नेता व्हायचे नाही. त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे राजीनामे नामंजूर करते आहे, अशी घोषणा त्यांनी भाषणादरम्यान केली होती.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची प्रतिक्षा 

मी आमदारकीला पराभूत झाले, याचे मला क्षणभरही वाईट वाटत नाही. कारण, राज्यातील जनतेने माझ्या शब्दावर विश्वास टाकून अनेक आमदार आणि खासदारांना निवडून दिले आहे. खूप कष्टांनी लोकं पदावर पोचत असतात, त्यांना त्या पदावरून खेचून मला माझी शक्ती वाढवयाची नाही, तेवढ्या कोत्या मनाची मी नाही. माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. मला शक्तीच दाखवयाची असती आणि दबाव आणायचा असता तर ही जागा पुरली नसती. मला दबाव आणयाचा नाही. आम्ही कधीच कुणासमोर कुठलीही मागणी केलेली नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मी काल दिल्लीत गेले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल, हे त्यांनी मला सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकारे खाऊन तुमच्यापुढे आली असते, असे वाटते का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केला होता.
 Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख