मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का? फडणवीस म्हणाले...   

तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारल तर त्यांना जास्त आनंद होईल.
मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का? फडणवीस म्हणाले...   
Ajit Pawar, Devendra Fadnavis .jpg

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसही नुकताच झाला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? या प्रश्नावर फडणवीस यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. (Devendra Fadnavis said about Ajit Pawar) 

फडणवीस यांनी एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यामध्ये ते म्हणाले, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारल तर त्यांना जास्त आनंद होईल. त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकली आहे. पण आता त्याबद्दल काय सांगायचे? पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असे विचारल्यानंतर राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी उत्तर देणे टाळले.

वाढदिवसा निमित्ता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या लेखाच्या संदर्भानेच फडणवीस यांना विचारण्यात आले की, तुमचे आणि अजित पवार यांचे नाते कसे आहे? त्यावर फडणवीस म्हणाले, प्रश्न नात्याचा नाही. वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता एवढी वर्षे अजित पवार राज्याच्या राजकारणात आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांचे काही ना काही कर्तृत्व आहेच. 

अनेक वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचे दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. मात्र, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मान्य करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला होता. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटते त्याबद्दल लेख लिहिला. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.  
Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in