मुख्यमंत्र्यांनी इतर देशांतील लाॅकडाऊन सांगितला! फडणविसांनी तेथील मदतीचे आकडे दिले!!

आम्ही जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावरच असल्याचा फडणविसांचा दावा...
devendra fadnavis uddhav thackray
devendra fadnavis uddhav thackray

मुंबई : राज्यात पुन्हा लाॅकडाऊनचा इशारा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्ष भाजपच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लाॅकडाऊनला विरोध करणे कसे चुकीचे आहे, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी जगातील इतर देश कोरोनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी काय करतात, याचा आढावा घेतला होता. तसेच विविध देशांत पुन्हा कसा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे, याची उदाहरणे दिली. राज्याच्या हितासाठी मी व्हिलन व्हायला तयार आहे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरेंच्या या दाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगातील इतर देश तेथील नागरिकांना कसे आर्थिक सहकार्य करत आहे, याची जंत्रीच प्रत्युत्तरात दिली. 

मुख्यमंत्र्यांना जनतेला दिलेला संदेशात अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, हंगेरी, डेन्मार्क, बेलजियम, आर्यलंड या विविध देशांमधील कोरोना स्थिती, दुसऱ्यांदा करावे लागलेले लॉकडाऊन आणि उपाययोजनांची माहिती राज्यातील जनतेला दिली. लॉकडाऊन घातकच आहे. अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक असले तरी त्यामुळे अर्थचक्र बिघडते, ही कात्रीतली स्थिती आहे. त्यामुळे मी कोरोनाला हरवणार, हे प्रत्येकाने ठरवायला हवे, स्वंयशिस्तीने वागायला हवे, गर्दी टाळायला हवी, अनावश्यकरित्या फिरणे बंद करायला हवे, असे आवाहन ही त्यांनी केले.  मागच्यावर्षी आपण एकजुटीने लढत कोरोना नियंत्रणात आणला होता,  त्याच पद्धतीने हातात हात घालून सर्व मिळून कोरानाशी लढू या आणि जिंकू या असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मात्र त्याच वेळी काही मंडळी केवळ लाॅकडाऊनला विरोध करत आहे. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी अवधी हवा आहे. ते लक्षात न घेता विरोधी पक्ष आणि काही उद्यागोपती (आनंद महिंद्र यांचे नाव न घेता) सरकारवर टीका करत आहेत. सेवासुविधा देता येतील पण डाॅक्टर, नर्स तातडीने कोठून आणणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनीे केला. तसेच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याऐवजी कोरोनाला हरविण्यासाठी आंदोलन करा, असा टोमणाही त्यांनी मारला. 

मुख्यमंत्र्यांच्या या शंकेला देवेंद्र फडणवीस यांनी पुढील मुद्यांच्या आधारे उत्तर दिले.

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला...पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’...पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...

डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...

पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...

आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय.. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!

विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोतआणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com