किरीट सोमय्यांवरील कारवाईने भाजप नेते आक्रमक  

सरकारची हिटलरशाही सहन करणार नाही.
  Devendra Fadnavis, Praveen Darekar .jpg
Devendra Fadnavis, Praveen Darekar .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवार (ता. २० सप्टेंबर) कोल्हापूरला जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देणार, असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांना रोखण्यासाठी ५० पोलिसांना फौजफाटा त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला आहे. त्यातच सोमय्या यांना कोल्हापूरात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.(Devendra Fadnavis criticizes the state government) 

या संदर्भात फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील. असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोमय्या यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. दरेकर म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी समजू शकतो पण मुंबईत बंदी का असे ते म्हणाले, सरकारची हिटलरशाही सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर पोलिस सरकारपुढे हतबल असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, सोमय्या यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की ''ठाकरे सरकारकडून दडपशाही अवलंबली जात आहे, माझा घराखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी लावला आहे. हसन मुश्रीफ गैरव्यवहार दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्री यांनी दिले आहेत. मी मुलुंडहून ५.३० ला निघणार आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता छत्रपती शिवाजी महराज रेल्वे स्टेशनवरुन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे. पण गृमंत्र्यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबार १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्या संदर्भात त्यांनी ईडी, सीबीआय या संस्थाकडेही त्यांची तक्रार केली आहे. मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देणार होता. मात्र, त्यांना आता जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तर सोमय्या यांच्या घरी पोहचलेल्या पोलिसांनी आम्ही तुम्हाला कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी आलो असल्याचे म्हटले आहे.   

दरम्यान,  सोमय्‍या यांनी मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्‍ह्यातील कार्यकर्ते संतप्‍त झाले आहेत. जिल्‍ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्‍हापूरकरांना आव्‍हान दिले आहे. त्यामुळे कितीही सुरक्षा दिली तरी त्यांना कोल्‍हापुरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्‍हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com