कांजूरमार्गाचा अट्टाहास का...फडणवीसांचा सवाल  - devendra Fadnavis criticizes government over metro car shed in kanjurmarg | Politics Marathi News - Sarkarnama

कांजूरमार्गाचा अट्टाहास का...फडणवीसांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचा आदेश दिले आहे. यावर राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सुप्रीम कोर्टाने आरेच्या जागेला परवानगी दिली होती. तर कांजुरमार्गाचा राज्य सरकारचा अट्टाहास का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मेट्रोपासून मुंबईकरांना दूर ठेवण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. 2024 पर्यंत मेट्रोचे काम लांबणीवर पडणार आहे. मनात येईल तसं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. 

फडणवीस म्हणाले की सरकारनं अहंकारासाठी कांजूरमार्गमध्ये कारशेडचे आदेश दिलं होते. ते बेकायदेशीर आदेश होते. आता सरकारनं आरेमध्ये कारशेडचं काम सुरू करावं. विकासकामात हार जीत नको, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने दिलेला आणखी एक धक्का आहे. दरम्यान, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात सरकार आहे. उच्च न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे.

दादा, भाऊंतील वैर संपले...फडणविसांची शिष्टाई यशस्वी..
पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यातील का रे दुरावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे काल मुंबईत संपुष्टात आला. त्याला महेशदादांच्या गोटातून आज दुजोरा देण्यात आला. भाऊ ज्येष्ठ असल्याने दादांनी मन मोठे करीत थोडी पडती बाजू घेतल्याने हा समेट झाल्याचे समजते. पण, तो झाल्याला खरा दुजोरा दुपारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतून मिळणार आहे. भाऊंच्या समर्थक सदस्यांच्या राड्याशिवाय ही बैठक पार पडली, तरच खऱ्या अर्थाने भाऊ, दादांच्या पाठिराख्यांतही ही दिलजमाई झाल्याचे स्पष्ट होणार आहे. २०१७ ला प्रथमच पालिकेत सत्ता आल्यानंतर दादा व भाऊ गटात पदाधिकारी नियुक्त्यांवरून शीतयुद्ध सुरु झाले. नंतर त्याला मोठे गंभीर वळण मिळाले. दरम्यान, एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना कट्टर विरोधक होऊन राज्यात तो सत्तेत आल्याने हा दुरावा आणखी वाढला. कारण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भाऊंचा कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या कामाला स्थायीतील दादा समर्थकांनी पाठिंबा दिल्याने हा वाद राडा होण्यापर्यंत गेल्या दोन बैठकांत पोचला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख