अहंकारी सरकारकडून पोरखेळ सुरू आहे...फडणवीसांचा सरकारवर निशाणा

सरकारकडून पोरखेळ सुरू आहे. हे सरकार अहंकारी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
23Devendra_20Phadanavis_201_1_1.jpg
23Devendra_20Phadanavis_201_1_1.jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालाचा विमान प्रवास यावरून राजकारण पेटलं आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाणीवपूर्वक विमान प्रवासास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. या विषयावर राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे. हे सरकार अहंकारी आहे." 

भाजप नेते सुधीर मनगंटीवार, गिरीश महाजन यांनी राज्यपालांना विमान नाकारल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरूवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. अखेर खासगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.

फडणवीस म्हणाले, "राज्यपालांबाबतीत घडलेला प्रकार हा दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख असतात, ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नियुक्त करतात. कालच याबाबत पत्र दिलं होतं, तयार फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती, असं असताना विमानातून उतरवणे अतिशय चुकीचे, कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय, हे सरकारनं लक्षात घेतले पाहिजे." 

"महाविकास आघाडी सरकारने पोरखेळ लावला आहे, ही घटना निषेधार्ह आहे. राज्याच्या इतिहासात इतकं अहंकारी असलेलं सरकार आजवर मी पाहिलं नाही. हा अहंकार कशासाठी ? असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. "राज्यपालांबाबत हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. विमान प्रवासासाठी परवानगी मिळावी, यासाठीची फाईल मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेली होती. मात्र, शेवटपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आला नाही आणि ऐनवेळी राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यात आले.

राज्याच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. एवढं अहंकारी सरकार आम्ही आधी कधीही पाहिले नव्हते. जनताच या सरकारचा फैसला करेल," असे फडणवीस म्हणाले. 

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच राज्यपाल व सरकारमध्ये सातत्याने वाद होत आहेत. राज्यपालांकडून अनेकदा सरकारवर जाहीर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. मागील तीन महिन्यांपासून 12 जणांची नावे राज्यपालांकडे देऊनही अद्याप त्यावर सही झालेली नाही. त्यावरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच नाराजीही व्यक्त केली. हा वाद थांबताना दिसत नाही.

मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास 20 मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खासगी विमानाने जावे लागले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com