भाजप आमदार म्हणतो, ``फडणविसांनी बिहार आणले... महाराष्ट्रातही पुन्हा येणारच! येणारच!! - devendra fadnavis brings victory to bjp in Bihar and now will return as CM in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार म्हणतो, ``फडणविसांनी बिहार आणले... महाराष्ट्रातही पुन्हा येणारच! येणारच!!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारमधील निकालाचा महाराष्ट्रावर प्रभाव पडण्याची भाजपला अपेक्षा 

पुणे : भाजपने  बिहारमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा दमदार यश मिळवल्याने सध्या पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीची जबाबदारी सांभाळलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेकजण अभिनंदन करीत आहेत.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीस यांच्या कल्पक नियोजनामुळे भाजपला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. आमदार नितेश राणे हे एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी बिहार देवेंद्रजी  आणले.. आता.. महाराष्ट्र ला पण देवेंद्रजीच पाहिजे.. पुन्हा येणार..येणारच!, असा विश्वास व्यक्त केला आहे. राणे यांच्या ट्विटमुळे बिहार निकालाचे पडसाद महाराष्ट्रावरही पडणार, असा विश्वास भाजपवाल्यांना वाटत असल्याचे दिसत आहे.

राणे यांच्या ट्विटरवर साहजिकपणे भाजप समर्थक आणि विरोधक तुटून पडले आहेत. शिवसेनेला बिहारमध्ये भोपळाही फोडता न आल्याबद्दलही अनेकांनी टीका केली आहे. `नोटा`पेक्षा कमी मते पडल्याने सेनेची नेटिझन्सनी खिल्ली उडविली. भाजपचे दुसरे नेते अतुल भातखळकर यांनी  बिहारमध्ये सोनिया सेनेला NOTA पेक्षा कमी मते... निवडणूक चिन्ह म्हणून बिस्किटच बरे होते. विनाकारण तुतारीची लाज काढली, अशा शब्दांत टीका केली. 

 बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्षांनीही फडणविसांच्या कामाचे कौतुक केले होते.

 अमित शहांचा नितीशकुमारांना फोन

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात भाजपकडून वेगळेच संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी थेट मुख्यमंत्री नितीशकुमारांना फोन केला.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

मतमोजणीत सायंकाळी सातपर्यंत एनडीएला एकूण 122 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा चारने कमी झालेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा तीनने वाढल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  41 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 74 जागा, राष्ट्रीय जनता दल 75, काँग्रेस 20 जागा असा कल दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख