डेरेक, माझा आदेश आहे सभागृहाबाहेर जावे, व्यंकय्या नायडू संतप्त  - Derek, my order is to get out of the hall, Venkaiah Naidu angry | Politics Marathi News - Sarkarnama

डेरेक, माझा आदेश आहे सभागृहाबाहेर जावे, व्यंकय्या नायडू संतप्त 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्यसभेचे अध्यक्ष नायडू हे शांत स्वभावाचे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे म्हणून ओळखले जातात. मात्र तेही विरोधी सदस्यांचा गोंधळ पाहून संतप्त झाले.

नवी दिल्ली : डेरेक तुम्ही सभागृहाबाहेर जा ! असा माझा आदेश आहे असे सांगत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू चांगलेच संतप्त झालेले आज पाहण्यास मिळेल. 
कृषि विधेयकांवरून तृणमूल कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आदी पक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले त्यामुळे राज्यसभेत या मुद्यावर अभुतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहण्यास मिळाला. 

राज्यसभेचे अध्यक्ष नायडू हे शांत स्वभावाचे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे म्हणून ओळखले जातात. मात्र तेही विरोधी सदस्यांचा गोंधळ पाहून संतप्त झाले. गेल्या दोन दिवसापासून प्रचंड आक्रमक असेलेले तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य डेरेक ओ. ब्रीन यांच्यावर नायडू खूपच चिडलेले दिसून आले.

डेरेक आपण सभागृहाच्या बाहेर जा असा माझा आदेश आहे त्यांनी सभागृहात सांगितले. अध्यक्षांनी डेरेक यांच्यासह आपचे सदस्य संजय सिंह, कॉंग्रेसचे राजू सातव, के.के. राजेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझीर हुसैन आणि इलामरण करीम या आठ सदस्यांना पुढील आठवडाभरासाठी अध्यक्षला निलंबीत करतानाच सभागृहाचे कामकाज दहा मिनीटासाठी तहकूब केले. 

राज्यसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणता येणार नाही. ते नियमातही बसत नाही असे सांगत नायडू यांनी विरोधकांची मागणीही फेटाळून लावली. आजच्या गोंधळाविषयी बोलताना नायडू म्हणाले, की राज्यसभेतील कालचा दिवस खूपच वाईट होता. काही सदस्य वेलमध्ये आले. उपाध्यक्षांसमोर गोंधळ घालताना त्यांना धमकी देण्यात आली . त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्यात आले. 

काल जे काही झाले ते दुर्दैवी आणि निषेधार्य होते. मी सर्व सदस्यांना सूचना करतो की प्रत्येकांनी थोडं आत्मपरिक्षण करावे. डेरेक यांचे राज्यसभेतील वर्तन तर समर्थनिय नव्हते त्यामुळे त्यांनी सभागृहाबाहेरच जाणे योग्य आहे आणि माझा तसा आदेश असल्याचेही नायडू यावेळी म्हणाले.  

हे ही वाचा : 
उपसभापतींच्या आसनावर आक्रमण करून कोणते राजकारण करीत आहात? स्मृती इराणींचा संतप्त सवाल 

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे.

आता सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना लक्ष्य केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख