'केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक..' अजित पवार यांचा आरोप - Deputy Chief Minister Ajit Pawar allegation that the Center should treat the state as a scapegoat | Politics Marathi News - Sarkarnama

'केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक..' अजित पवार यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सरकारला काहीही होणार नाही. आता जाणार, आता जाणार पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. 

कराड : "केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत आहे," असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अजित पवार यांनी चव्हाण यांना अभिवादन केलं त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. 

 पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार टिकेल का या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार पडणार आहे, हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं. 

अजित पवार म्हणाले,  "उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, सरकारला काहीही होणार नाही. आता जाणार, आता जाणार पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. 

हेही वाचा : सदाभाऊ खोत राज्यपालांना सूचविणार बारा जणांची नाव   
मुंबई : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे आज सकाळी अकरा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. सदाभाऊ खोत कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त आमदार कोण असावेत त्या 12 नावांची वैशिष्टपुर्ण यादी देखील सादर करणार आहेत. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भातही राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलिपराव आवळे आणि शिवाजी पाटील यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत न्यायालयात यापूर्वी याचिका केली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख