फडणवीसांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण - Deputy Chief Minister Ajit Pawar admitted to Breach Candy Hospital for treatment | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या दहशतीतही रस्त्यांवर उतरत, लोकांमध्ये मिसळून भल्या पहाटेपासून काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अखेर कोरोनाने घेरले. पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

पुणे, : कोरोनाच्या दहशतीतही रस्त्यांवर उतरत, लोकांमध्ये मिसळून भल्या पहाटेपासून काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अखेर कोरोनाने घेरले. पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  पवार यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना उपचारासाठी आज मुंबईत ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दुसरीकडे, पवार यांच्यासमवेत बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावलेल्या नेत्यांसह अधिकाऱ्यांच्याही तपासण्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाय करीत, बैठकांचा सपाटा लावला होता. त्यात पहिल्या रुग्ण पुण्यात सापडला आणि त्यानंतर पुण्यातच कोरोना प्रमाणेबाहेर पसरल्याने पवार यांनी पुढाकार घेत, नवे उपाय आखले. आठवड्यातून एका किमान आठ-दहा तास बैठका घेत, पवार यांनी कोरोनावर मात करण्याची व्यूहरचना आखली.

त्याचवेळी गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विकासकामांनाही प्राधान्य देऊन पवार यांनी कामांना गती देण्याच्या हालचाली केल्या. याच काळात पवार हे राज्यभरातील अन्य शहरांमध्येही फिरत राहिले. तेव्हा, रोज अनेकजण त्यांच्या संपर्कात होते. याआधी त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, ते निगेटिव्ह असल्याचे अहवाल आले. परंतु, मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली: तेव्हा त्यांचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला.

पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी पवार यांच्या पुढाकारातून जम्बोसह बाणेरमधील स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारले गेले. कोरोनाच्या गेल्या सात-आठ महिन्यांच्या दहशतीतही सुरक्षित राहिलेल्या पवारांना कोरोना झाल्याने पुन्हा भीती पसरली आहे.मात्र, लक्षणे आणि त्रास त्यांच्यावर तुर्तास घरीच उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दुसीकडे, पवार यांच्या सर्पकातील आलेल्या शेकडो जणांच्या तपासणीही करण्यात येत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख