माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वेदना होत आहेत; राहुल गांधी

राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले होते, त्यांच्या शरिरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता.
 Rahul Gandhi .jpg
Rahul Gandhi .jpg

पुणे : काँग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (On the demise of Rajiv Satav, Rahul Gandhi said he lost a close friend)
 
राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले होते, त्यांच्या शरिरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. त्यामुळे त्यांचे आज सकाळी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीट करत राजीव सातव यांना श्रद्धाजली वाहिली आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, ''माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वेदना होत आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीला आणि आदर्शांना बळकटी देणारे आदर्श नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

''काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो'', अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ''राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझे हे असे जाणे भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?''

दरम्यान, 19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सातव यांच्यावरील उपचारासाठी मदत केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com