Delhi prepares to celebrate PM Modi's birthday! : Information provided by Smriti Irani | Sarkarnama

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस कसा साजरा करायचा याची दिल्लीत तयारी ! : स्मृती इराणींनी दिली माहिती 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. लोकांच्या आर्शिवादाने पंतप्रधान मोदी यांना दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंडियाचे ध्येय साध्य करू या असे इराणी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस महत्त्वाचाच आहे. हा वाढदिवस उत्साहात कसा साजारा करायचा याची चिंता अर्थात देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना लागून राहिली होती.

मात्र मात्र भाजप कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही कारण केंद्रीय स्तरावर भाजप कार्यालयात मोदींच्या वाढदिवसाची तयारी करण्यात येत आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या लाडक्‍या मंत्री स्मृती इराणी याविषयी माहिती दिली आहे आणि त्यांनी तसे ट्‌विटही केले आहे. या ट्‌विटमध्ये स्मृती इराणी यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील कार्यालयात एक सादरीकरण केले आहे

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. लोकांच्या आर्शिवादाने पंतप्रधान मोदी यांना दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंडियाचे ध्येय साध्य करू या असे इराणी यांनी म्हटले आहे. 

देशभर कोरानोचे संकट आहे. या संकटात पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आला आहे. मात्र योळी कोरोनाच्या संकटामुळे कसा वाढदिवस साजरा करायचा हा प्रश्‍न होता. मात्र दिल्ली कार्यालयात मोदींच्या वाढदिवस साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते. 

हे ही वाचा: 
दोन वेळच्या जेवणाचाही संघर्ष 
मुंबई : लॉकडाऊननंतर जवळपास तीन महिने कामाअभावी घरीच बसून होतो. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आणि कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जून महिन्यात उत्तर प्रदेशातील गाव गाठले. मात्र, तेथेही पोटापाण्याची सोय झाली नाही. जवळची जमापूंजीही संपत आली. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन पुन्हा मुंबईत आलो. 

मुंबईत येऊनही पूर्वीच्या तुलेनेने निम्मेही काम मिळत नसल्याने दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे मालवणी येथे शिवणकाम करणारा शफीक सिद्धिकी सांगत होता. शफीक हा अनेक कामगारांचा प्रातिनिधीक उदाहरण. एक-दोन पिढ्यांपासून मुंबईत राहणारे अनेक लहान-मोठ्या कामगारांची हीच परिस्थिती आहे.
 
आई, वडील, बहीण, पत्नी आणि मुलगी अशा पाच जणांची जबाबदारी शफीकवर आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला कामच नसल्याने बचतीतून घर चालवले. पण दोन-तीन महिन्यात बचतीतील पैसेही संपले. स्वतः एकवेळ जेवण करेल, पण आई-वडील, मुलीला उपाशी कसे ठेवणार? गावी गेल्यावरही रोजगाराचा प्रश्‍न होताच. त्यामुळे चार दिवसांपूर्वी मुंबईत परतलो. पूर्वी रोज 400 ते 500 रुपयांचे काम करायचो.

 पण, आता त्याच्या निम्मेही मिळत नाही. व्याजाने पैसे घेऊन मुंबईत आलो असल्याने आता ते कर्ज कसे फेडायचे? संपलेली बचत पुन्हा उभारून रोजचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्‍नही शफीकला सतावत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख