जुहीला पब्लिसिटी स्टंट पडला महागात; न्यायालयाने ठोठावला 20 लाखांचा दंड

मोबाईल टॅावरमधून बाहेर पडणारे रेडिएशन नागरिकांसाठी असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा याचिकेत केला होता.
Delhi High Court dismisses the lawsuit filed by actor Juhi Chawla
Delhi High Court dismisses the lawsuit filed by actor Juhi Chawla

नवी दिल्ली : भारतातील प्रस्तावित 5G नेटवर्कविरोधात अभिनेत्री जुही चावला यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका केवळ प्रसिध्दीसाठी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने जुही चावलाला 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (Delhi High Court dismisses the lawsuit filed by actor Juhi Chawla )

भारतामध्ये पुढील काही वर्षांत 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली. पण याच्या मोबाईल टॅावरमधून बाहेर पडणारे रेडिएशन नागरिकांसाठी असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा जुही चावला यांनी याचिकेत केला होता. त्यामुळं याची अंमलबजावणी करण्याआधी रेडिएशन नागरिक व पक्षांसाठी सुरक्षित असल्याची हमी सरकारने द्यावी, तसेच त्याचा खोलवर अभ्यास करावा, असे जुही यांनी याचिकेत म्हटलं होतं. 

या याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकेवरच आक्षेप नोंदवला. या याचिकेमध्ये कोणताही ठोस मुद्दा नसून ती अकारण दाखल करण्यात आली आहे. केवळ प्रसिध्दीसाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच या याचिकेत याचिकाकर्ते असलेल्या जुहीसह सर्वांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

काय म्हटलं होतं याचिकेत?

आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. वायरलेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अनेक उत्पादनांचा आम्ही वापर करत आहोत. पण हा वापर करताना त्याचा अतिरेक होऊ नये, याकडेही लक्ष्य देण्याची गरज आहे. आपल्याच संशोधन व अभ्यासातून वायरलेस उत्पादने आणि मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशन घातक असल्याचे याचिकेत म्हटले होते. 

तसेच 5G तंत्रज्ञान हे नागरिक, पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे, ही ग्वाही संबंधित विभागाने द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी असा अभ्यास झाला नसल्यास सध्याच्या स्थितीत आणि भविष्याचा विचार करून पुरक अभ्यास होण्याची गरज आहे. लहान मुलांचे आरोग्य तसेच भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी जुही यांनी केली होती. जुही चावला यांनी यापूर्वीही मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशनविरोधा आवाज उठवला आहे. पर्यावरणासाठी काही वर्षांपासून काम करत असून वायरलेस नेटवर्कविरोधात त्यांनी पहिल्यांदाच याचिका दाखल केली होती.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com