गुड न्यूज : आता दोन तासात पोहचणार घरपोच Oxygen..सरकारचा निर्णय.. - delhi cm arvind kejriwal starts oxygen concentrator bank for home isolation corona patients delhi | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : आता दोन तासात पोहचणार घरपोच Oxygen..सरकारचा निर्णय..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

 'ऑक्सीजन कंसंट्रेटर बँक' सुरु करण्यात येणार आहेत

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ऑक्सीजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. यावर दिल्ली सरकारने उपाय शोधून काढला आहे. केजरीवाल सरकारनं याबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. "कोरोना रुग्णांपर्यंत आमचे पथक दोन तासात त्यांच्या घरापर्यंत 'ऑक्सीजन' देऊ शकतील," अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.  
delhi cm arvind kejriwal starts oxygen concentrator bank for home isolation corona patients delhi

राजधानी दिल्लीमध्ये  'ऑक्सीजन कंसंट्रेटर बँक' सुरु करण्यात येणार आहेत.  या 'ऑक्सीजन कंसंट्रेटर बँक' बाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारने प्रत्येक जिल्ह्यात  'ऑक्सीजन कंसंट्रेटर बँक' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक बॅंकेत किमान २०० ऑक्सीजन सिलिंडर असणार आहेत. गरजूंच्या घरापर्यंत 'ऑक्सीजन' पोहचविण्याचे काम सरकार करणार आहे. 

गेल्या २४ तासामध्ये दिल्लीत ६ हजार ५०० नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दिल्लीत ८ हजार ५०० रुग्ण आढळले होते. कोरोनाचा रुग्णांच्या आकडेवाडीचा दर कमी होऊन तो ११ टक्क्यांवर आला आहे. दिल्लीत रुग्णांची संख्येत काहीशी घट होत आहे. दिल्ली सरकारने १५ दिवसात १ हजार आयसीयू  ICU बेड तयार केले आहे. यासाठी डॅाक्टर, इंजिनिअर यांनी परिश्रम घेऊन हे काम लवकर केले, याबाबत मी त्यांचा आभारी आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.
 
हेही वाचा सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आर.एल. भाटिया यांचे निधन
    
अमृतसर  : कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल रघुनंदन लाल भाटिया (वय १००) (आर.एल. भाटिया) यांचे आज अमृतसर येथे निधन झाले, त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली आहे. त्याच्या मागे मुलगा रमेश भाटिया, मुलगी सरोज मुंजल, लहान भाऊ जे. एल. भाटिया असा परिवार आहे.  आर.एल. भाटिया हे  १९७२ पासून सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आर.एल.भाटिया हे २००४ ते २००८ पर्यंत केरळचे राज्यपाल होते. तर २००८ ते २००९ या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. काल त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान  त्यांचे आज निधन झाले. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख