दिल्लीत परिस्थिती चालली हाताबाहेर; रुग्णालये भरू लागली... - Delhi CM Arvind Kejariwal Gives hint of Lockdown amid surge of covid | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

दिल्लीत परिस्थिती चालली हाताबाहेर; रुग्णालये भरू लागली...

वृत्तसंस्था
रविवार, 11 एप्रिल 2021

राजधानी दिल्लीमध्येही आता कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. राजधानी दिल्लीमध्येही आता कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने केवळ त्रास होत असलेल्या रुग्णानांच रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची लक्षणे नसतील रुग्णांनी घरीच उपचार घ्यावेत. त्यासाठी वैद्यकीय यंत्रणा घरी येईल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

केजरीवाल यांनी आज अॅानलाईन पत्रकार परिषद घेत उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गृहविलगीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. लक्षणे नसतील आणि त्याचा त्रास नसेल तर रुग्णालयात दाखल होण्याचा अट्टहास करू नये. त्याने रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासणार नाही. त्रास होणाऱ्यांना बेड उपलब्ध होऊ शकेल. रुग्णालये भरली, तर गरजू रुग्णांना जीव गमावावा लागेल, अशी भीती केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील कोरोनाची लाट धोकादायक आहे. पण राजधानीत आत्ताच लॉकडाऊन करणार नाही. मात्र, आरोग्य सुविधा कमी पडल्यास त्याचा विचार करावा लागेल. कोरोनाचा प्रसार थांबला नाही, तर लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा इशारा केजरीवाल यांनी दिला. 

दिल्ली सरकारने बेडसाठी रुग्णालयांचा अॅप तयार केला आहे. तो पाहून ज्या रुग्णालयात बेड आहेत, थेट तिथेच जावे. बेडसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकावे लागणार नाही. दिल्लीतील रुग्णांच्या आकडेवारीनुसार, 65 टक्के रुग्णांचे वय ३५ वर्षांखाली आहेत. त्यामुळं कोणत्याही वयाची मर्यादा न ठेवता देशभर लसीकरण सुरू केले पाहिजे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. 

लसीकरण मोहीम वेगाने राबविल्यास संसर्गाचे प्रमाण रोखता येईल. आम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास तयार आहोत. केंद्राने तशी परवानगी दिली, तर तीन महिन्यांत संपूर्ण दिल्लीचे लसीकरण करता येईल, असा विश्‍वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख