निलेश लंकेंची एक कोटी रुपयांची नोटीस आणि त्याला मनसेचे दहा पानी उत्तर!  - defamation notice of Nilesh Lanka against MNS leader | Politics Marathi News - Sarkarnama

निलेश लंकेंची एक कोटी रुपयांची नोटीस आणि त्याला मनसेचे दहा पानी उत्तर! 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

आमदार निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई : बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Mla Nilesh Lanka) यांनी पारनेरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्याला अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. अविनाश पवार असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. लंके यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे. (defamation notice of Nilesh Lanka against MNS leader)

आमदार निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी ट्विट करत आमदार लंके यांना आव्हान दिले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की ''अब्रुनुकसानीची नोटीस आहे, की खंडणीसाठीचे पत्र? आपल्या ह्या बेकायदेशीर नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊच. निलेश लंकेजी ही लढाई आपण सुरू केली पण ही लढाई संपवणार आम्हीच हे निश्चित.. ही मानहानी नाही, खंडणी आहे''. असी टीका चित्रे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरेंवर बारामतीत गोळीबार

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की,  मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन निलेश लंके यांची सोशल मीडियावर बदनामी केली. त्यामुळे त्यांना कायदेशीर १ कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. लंके यांचे काम जगभर पोहचले आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचे चांगले उदाहरण निर्माण केले आहे. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्यांना कायदेशीर नोटीस देणे आवश्यक असल्याचे झावरे यांनी सांगितले आहे. 

निलेश लंके यांनी अविनाश पवार यांना कधीही फोन केलेला नसतानाही, लंके यांची बदनामी करण्यासाठी पवार यांनी ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी केली असल्याचे लंके यांनी पाठवलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आहे.  

लंके यांच्या नोटीसीनंतर अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवा. त्यांना सांगा की तुमचा सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. ११ मेला माझ्यासोबत एक प्रसंग घडला आहे. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना लंके यांनी डॅा. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॅा. गंधे यांनी मला आमदार लकेंसोबत बोलण्यास सांगितले. त्यावेळी लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनीच मला खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला. 

आमदार अनिल भोसलेंना आणखी एक दणका: शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचा परवाना रद्द 

लंके यांच्यापासून मला माझ्या कुटुंबाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माझे काही बरेवाईट झाले तर हाच व्यक्ती जबाबदरा राहिल. हेच आमदार चुका करुन माझी बदनामी करत आहेत. माझे आई वडिल वयस्कर आहेत, त्यांना काही झाले तर निलेश लंके जबाबदार असतील.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख