आरक्षणाचा निर्णय आता केंद्रानेच घ्यावा; संभाजीराजेंची सडेतोड भूमिका 

केंद्र सरकारने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
आरक्षणाचा निर्णय आता केंद्रानेच घ्यावा; संभाजीराजेंची सडेतोड भूमिका 
Sambhaji Raje Chhatrapati .jpg

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले मुक आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मुक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूर मधून झाली होती. त्यानंतर नाशिकला आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या आहेत. तर काही मागण्यांसाठी वेळ मागितला आहे, त्यामुळे काही काळासाही हे आंदोलन स्थगित करण्यात येत, असल्याची घोषणा संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केली. (The decision on reservation should now be taken by the Center) 

संभाजीराजे बीड येथे बोलत होते. राज्य सरकार त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी करत असेल तर त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असेही ते म्हणाले. मुक आंदोलन स्थगित केले असले तरी सुद्धा अनेक ठिकाणी बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. आता राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवता येऊ शकेल. त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा, घटना दुरुस्ती करावी आणि राज्यांना अधिकार द्यावेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.  

आता केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आता राज्याला फक्त शिफारस करण्याचे अधिकार राहिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे, संभाजीराजे यांनी सांगितले. राज्य सरकारकडे आम्ही प्रमुख पाच सहा मागण्या केल्या होत्या. त्या त्यांनी मान्य केल्या आहेत. त्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामध्ये सारथीच्या केंद्राचे काम कोल्हापूरला सुरु झाले असल्याचे संभाजीराजे म्हणाले.  

Related Stories

No stories found.