धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णय शंकास्पद...   - The decision to open religious places is questionable | Politics Marathi News - Sarkarnama

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णय शंकास्पद...  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

कोरोना लाट येण्याची शक्यता असताना काल ठाकरे सरकार ने सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळ सर्वांसाठी उघण्याची घोषणा केली आहे. पण या निर्णयावरच खर तर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.

बुलढाणा : सध्या दिवाळी सुरु असून काल राज्यात 4 हजारावर कोरोना रुग्ण आढळले आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक गर्दी करीत आहेत. कुठे कोरोना संबंधी नियम पाळले जात आहेत, कुठे नाही. त्यामुळे तज्ज्ञांनी येणाऱ्या काळात कोरोनाची दूसरी लाट येण्याचे शक्यता वर्तविली आहे. 

कोरोना लाट येण्याची शक्यता असताना काल ठाकरे सरकार ने सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळ सर्वांसाठी उघण्याची घोषणा केली आहे. पण या निर्णयावरच खर तर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. आगामी येणारी कोरोनाची दूसरी लाट ही मंदिरे किंवा धार्मिक स्थळ उघडल्यामुळे आली असं खापर मग मंदिरातील गर्दीमुळे सरकार फोडून मोकळे होईल. परत लोकडाउन सुरु होऊन सर्वस्वी धार्मिक स्थळ जवाबदार असल्याचं भासवून आपली जबाबदारी झटकुन सरकार मोकळ होईल, म्हणून आम्हाला सरकारच्या या निर्णयावर शंका वाटत आहे, असे स्वाभिमान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. 

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.
 

हेही वाचा :  "हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार.." 

मुंबई : राज्य सरकाराला कोरोनामुळं जनतेची काळजी आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी हळूहळू सर्व काही सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रार्थनास्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक म्हणत असतील हा उशीर आहे, तर तसं काही नाही. काही निर्णय घेताना योग्य काळजी घ्यावी लागते. हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार आहे. कोरोनामुळं लोक काही नाराज‌ झाली. पण त्यानंतर चांगले निर्णय घेऊन सरकार पुढे‌ जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. "गेल्या वर्षी दिवाळीत राज्यात सत्तांतर झाले होते, मागील वर्षी अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले. परंतू आम्ही त्याला पुरून उरलो. जुनी थडगी उकरायचे किरीट सोमय्या यांनी बंद करावेत," असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संजय राऊत म्हणाले, "विरोधकांनी राज्यात 'आँपरेश लोटस' सारखी अनेक आँपरेशन केली पण कुठेच खरचटल नाही. या राज्यात आता कोणतीच ऑपरेशन होणार नाही. महाविकास आघाडीने राज्यात एक वर्षाचा काळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल."
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख