अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाखांवर  - The death toll from the corona in the United States is over two million | Politics Marathi News - Sarkarnama

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाखांवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्यावर गेली असली तरी वास्तव संख्या याहूनही अधिक असण्याचा अंदाज आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. संसर्गाच्या सुरवातीच्या काळात अतिशयोक्ती वाटणारी ही संख्या प्रत्यक्ष गाठली गेली आहे. कोरोना संसर्गाचा जगात सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसला आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही अमेरिका आघाडीवर आहे. उच्च दर्जाची वैद्यकीय यंत्रणा, मुबलक साधन संपत्ती आणि सरकारचे भक्कम आर्थिक पाठबळ असतानाही अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले. संसर्गाचे गांभीर्य सुरवातीला न ओळखल्यामुळेच आणि नंतरच्या काळात अनलॉकची घाई केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्यावर गेली असली तरी वास्तव संख्या याहूनही अधिक असण्याचा अंदाज आहे. सध्या अमेरिकेत दररोज सरासरी ७७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतो. अमेरिकेत शाळा सुरु होत असल्याने आणि हिवाळ्यालाही सुरुवात हो असल्याने या वर्षाअखेरीपर्यंत अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या चार लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज वॉशिंग्टन विद्यापीठाने व्यक्त केला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये सीबीआयचे छापासत्र 
कोलकता : भारत-बांगलादेश सीमाभागात जनावरांच्या बेकायदा व्यापार प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयने आज पश्‍चिम बंगालच्या विविध शहरात छापे घातले. कोलकता आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळी छापे घातल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. छापासत्र मोहिम सायंकाळपर्यंत सुरू होती आणि देशातील अन्य भागातही याप्रकरणी छापे घातले जातील, असेही सांगण्यात आले. 

गेल्या वर्षापासून पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश सीमेवरुन जनावरांची तस्करी केली जात असल्याचा सीबीआयचा संशय आहे. जनावरांची तस्करी केली जात असताना त्यांच्या गळ्यात सॉकेट बॉम्ब लावण्यात येत असे. जेणेकरून जनावर पकडल्यास जवानांची हानी होईल, असा उद्देश होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख