मतदान झाले अन् उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक

उमेदवाराचे निधन झाले असले तरी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानेनिवडणूक रद्द केली जाणार नाही.
Death of Congress candidate MadhavaRao due to  Covid
Death of Congress candidate MadhavaRao due to Covid

चेन्नई : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका सुरू आहे. पण या भागात कोरोनाच्या कोणतेही नियम पाळले जात नाहीत. पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांच्या सभांना गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका उमेदवारांनाही बसत आहे. तमिळनाडूनतील काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तमिळनाडूमध्ये 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान झाले आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच मतदारही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नव्हते. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना हा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतत आहे.

श्रीविल्लीपुथुर विधानसभा मतदरासंघात काँग्रेसकडून पीएसडब्ल्यू माधव राव हे उमेदवार आहेत. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे मागील महिन्यात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यातून त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तमिळनाडू प्रभारी संजय दत्त यांनी ट्विटरवरून ही माहिती देत दु:ख व्यक्त केले आहे.

दरम्यान, माधव राव यांचे निधन झाले असले तरी निवडणूक रद्द केली जाणार नाही. त्यांच्या मृत्यूपुर्वीच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर निवडणूक निकाल 2 मे रोजी आहे. या निवडणुकीत ते विजयी झाल्यास पोटनिवडणूक घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान, माधव राव यांच्या मृत्यूमुळे मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना असूनही निवडणूक काळात नियमांचे उल्लंघन होत असल्याने अनेकांनी प्रचार सभांवर टीकाही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनही प्रचार सभा घेतल्या जात आहे. अमित शहा यांच्याकडून रोड शो केले जात आहेत. तसेच इतर पक्षांचे नेतेही कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांकडून टीका होत आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com