DCP ला 40 तर; ACP ला 30 तोळे सोन्याचे बिस्किट दिवाळीला परमबीरसिंगांना द्यावे लागत होते.....

परमबीरसिंग यांच्याविरोधात सरकारकडे आणखी काही गंभीर तक्रारी दाखल
parambirsngh
parambirsngh

अकोला : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर सात्यत्याने पोलिस विभागातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  एकएक करुन त्यांचे कारनामे आता समोर येत असून देशद्रोरासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर होवू लागले आहेत. 

परमबीर यांच्या  विरोधात अनेक पुरावे हे गृह विभागाला पोलिस विभागातीलच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्याखालील अधिकाऱ्यांनी दिले आहे. या सदंर्भात सुध्दा त्यांची चौकशी करण्याची तयारी आता सुरु झाल्याचे कळते. पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबिर सिंग यांनी कशा प्रकारे सराईत आरोपींना मदत केली आहे, याचे अनेक दाखले डांगे यांनी त्यांच्या तक्रारीत दिले आहे. अशातच अकोल्याचे पोलिस निरीक्षक यांची तक्रार पुढे आली आहे. परमबीरसिंग हे ठाणे येथे पोलिस आयुक्त असतांना तेथे कार्यरत असलेले भीमराव घाडगे यांचे १४ पानाचे जे पत्र समोर आले आहे. त्यातील आरोप तर अंत्यत गंभीर आहेत. हे आरोप माध्यमांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाले. त्यावर अद्याप परमबीरसिंग यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत त्यांचे म्हणणे कळालेले नाही. ते आल्यानंतर त्यांचे उत्तरही प्रसिद्ध करण्यात येईल.  

घाडगे यांच्या आरोपानुसार त्यांनी अवैध मार्गाने हजारो कोटी रुपयाची माया जमवली असून ती त्यांनी पत्नी, मुलगा आणि त्यांच्या काही निकटवतीयांच्या नावाने भारतासह विदेशात गुणतनुक केल्याचे घाडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

या अगोदर राज्य सराकारने परमबीरसिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले असून पोलिस महासंचालक संजय पांडे ती सुरु केली आहे. अनुप डांगे यांच्या तक्रारीची चौकशी सुरू झाल्यानंतर आता घाडगे यांच्या तक्रारीवर सुध्दा चौकशी होणार  असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या पत्रातील ठळक मुद्दे --

- परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त,ठाणे शहर व अन्य कोणत्याही ठिकाणी नेमणुकीस असतांना त्याचे सोबत पोलिस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा मो.नं.९८६७०५९२९२ आणि पो.ना.प्रशांत पाटील मो.नं.९८२१८६९६२५ असे दोघजण हे गेले २० वर्षांपासुन सोबत होते. त्यांच्यासोबत दिवसरात्र खाजगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. त्या दोघांनाही परमबीरसिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे, याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीरसिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दुसऱ्याचे नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.

-परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे येथे नेमणूक होण्यापुर्वी ते पोलीस आयुक्त,परिमंडळ-३,कल्याण येथे नेमणुकीस असल्यापासुन ते प्रकाश मुथा (रा. कल्याण) यांना चांगल्या प्रकारे ओळखत असुन ते त्याचे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत रिव्हाॅल्वर  लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवून लायसन्स दिले जात होते. तसेच बिल्डरांची कामे त्यांच्यामार्फत होऊन त्यामध्ये करोडो रूपयांची देवाणघेवाण वा सेटलमेंट करून केली जात होती. जो पोलीस अधिकारी त्यांचे बेकायदेशीर ऐकत नसे
त्याच्याविरूद्ध खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियत्रंण कक्ष येथे केली जात होती. (उदा.पो.नि. कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझ्याविरूध्द पाच खोटे गुन्हे नोंदविले होते.)

-परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांच्याकडे बदल्यांतील भष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे देखील काम करत होते.

परमबीरसिंग यांची करोडो रुपयांची संपत्ती जमविल्याचा  आरोप घाडगे यांनी केला आहे. सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे.

-परमबीरसिंग हे दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनचे डिसीपी कडुन प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलिस आयुक्ताकडुन प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट घेत होते.

परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण रेतीबंदर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हददीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपर वजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज करोडो रूपयाची उलाढाल होत होती. त्यामध्ये पराग मणेरे हे भागीदार होते. रेती माफिया शेगप करेल हा होता. अवैध रेती व्यावसायिकावर कायदेशीर कार्यवाही केल्यास त्या पोलिस अधिकाऱ्याविरूध्द खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकविले जात होते त्यामध्ये मलाही
खोटया गुन्हयात अडकाविले आहे.(सदर बाबत मी दि.१७ मार्च,२०१६ रोजी लेखी तकार
दिलेली आहे.) असेही पत्रात म्हटले आहे. तसेच परमबीरसिंग यांनी त्याचा मुलगा रोहन यांचे नावाने सिंगापुर येथे व्यवसाय सुरू केला असुन त्यामध्ये सुमारे रू.२०००/- करोडची गुतवणंक केली असुन त्यामध्ये सुमारे रू.५००/- करोडचे नुकसान या वर्षी झाल्याचे गोपनीयरित्या समजले आहे.

परमबीर सिंग यांनी अॅन्टालिया रोड, मुंबई येथे रूपये ६३ करोडचा बंगला वजा प्लॅट खेरदी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुलगा रोहन याच्या लग्नानिमित्त चंडिगड, बंगलोर येथे  करोडे रूपये खर्च केले आहेत. लग्नाचे रिसेप्शन मुंबई येथे करण्यात आले होते. परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गु खटवाणी कोपरी यांचेकडे सुमारे रू.१००/-करोडची गुंतवणूक केली आहे. तसेच बिल्डर जितु नवलाणी,मुंबई यांचेकडे सुमारे रू.१०००/-करोडची गुंतवणूक वेगवेगळया
व्यवसायात केली आहे.

परमबीर सिंग यांनी त्यांची पत्नी सौ.सविता हिचे नावाने खेतान ॲन्ड कंपनी ही उघडली असुन कार्यालय इंडिया बुल इमारत,६ वा मजला,लोअर परेल,मुंबई येथे आहे. तसेच त्या इंडिया बुल या कंपनीच्या संचालक आहेत. इंडिया बुलमध्ये सुमारे रू.५०००/-करोडची गुंतवणूक केली असल्याची गोपनीय माहिती मिळालेली आहे.

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त,ठाणे शहर असतांना ते पोलीस अधिकाऱ्याचे बदल्यात भष्टाचार करत असल्याने सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे सुरू होते त्याचे दरमहा करोड रूपये हे परमबीर सिंग यांना त्यांच्या हस्तकामार्फत मिळत होते.

त्यांनी मला माझ्याकडे तपासास असलेल्या गुन्हयातील गर्भश्रीमंत आरोपीचे नाव गुन्ह्यांतून काढुन टाकण्याचे बेकायदेशीर आदेश दिले ते मी न ऐकल्याने त्यांनी माझेविरूध्द खोटे गुन्हे नोंदविल्यानंतर मला निलंबित केलेनंतर माझ्याकडील तपासास असलेल्या गुन्हयातुन गर्भश्रीमत आरोपीचे काढुन टाकण्यात आली व काही गुन्हे 'क' समरी करण्यात आले त्यामध्ये सुमारे दोनशे कोटींचाडचा भष्टाचार झालेला आहे. त्या आरोपीची नावे व गुन्हाही पत्रात नोंदवण्यात आला आहे. 


-परमबीर सिंग हे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, बृहन्मुंबई येथे कार्यरत असतांना,त्यांनी सलील चर्तुवेदी,प्रोव्हिोग कंपनीचे संचालक यांना विमानतळ पोलीस ठाणे गु.रजि.नं.१७/२००५ एन.डी.पी.एस.कायदा कलम ८(क),२१,२९ सह भा.द.वि.कलम १२० (ब),२१८,४०९,२०० या गुन्हयात अटक करून त्यास आरोपी करण्यात आले व त्यांचेविरूध्द मा. विशेष न्यायालय,एन.डी.पी.एस.न्यायालय,मुंबई यांचे न्यायालयात दोषारोप पत्र कं.८०/२००८ अन्वये दाखल केले होते त्या केसमध्ये सुनावणी अंती दि. ०३/०४/२००९ रोजी आरोपी सलील चर्तुवेदी यांस निदोष मुक्त केले आहे. सलील चर्तुवेदी,प्रोव्हिोग कंपनीचे संचालक यांना खोटया अमली पदार्थाच्या केसमध्ये अडकविल्याने त्यांनी मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे किमीनल रिव्हिजन अपलीकेशन नं.४१९/२००६ दाखल करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मा.उच्च न्यायालयाचे आदेशाने राज्य गु.अ.विभाग,पुणे यांचेमार्फतीने चौकशी करण्यात आली असता तत्कालीन पोलिस महासंचालक एस. पी. एस. यादव यांनी स्पष्ट अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सलील चतुर्वेददी यांना अमली पदार्थाच्या केसमध्ये खोटे गुंतविण्याच्या प्रकरणांत श्री.परमबीर सिंग व पोलिस निरीक्षक केंजळे यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झालेले असतानाही फक्त गुन्हा हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक गाताडे व निरीक्षक केंजळे यांच्याविरूद्धच गुन्हा नोंदविण्यात आला.  त्यांच्याच विरूध्द न्यायालयात
दोषारोपपत्र पाठविण्यात आले. परंतु खरा सूत्रधार परमबीरसिंग हे होते. त्यांच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही न करता त्यांस वाचविण्यात आले.

तेलगी घोटाळ्यातही परमबीरसिंग यांचे नाव 

मीरारोड पोलिस स्टेशनचे तत्कालीन उपनिरीक्षक वजीर शेख (सध्या निरीक्षक, कोराडी पोलीस स्टेशन,पोलीस आयुक्तालय, नागपूर) यांनी परमबीरसिंग (तत्कालीन पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण) यांना लेखी पत्र देऊन बनावट स्टॅम्पचा कारखाना जप्त करणेबाबत कळविले होते, परंतु प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी परमबीरसिंगांचे व इतर पोलीस अधिकांऱ्याचे आर्थिक हितसंबंध
असल्याने त्यांनी बनावट स्टॅम्पचा कारखाना जप्त केला नाही. तसेच मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी यास देखील अटक केली नव्हती. असा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. 

घाडगे या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्रात परमबीर यांच्यावर तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान शेवटी त्यांनी  या प्रकरणी त्याचेविरूध्द कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी आपणास नम्रपणे विनंती करतो की, एसआयटी. स्थापन करून माझ्याविरूद्ध दाखल केलेल्या खोटया गुन्ह्यांचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द व त्यांना मदत करणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करून तपास करण्याचे विनंती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com