गावातच राहून करा कमाई! सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या! - csc you can earn with a common service center what you need to know all steps | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

गावातच राहून करा कमाई! सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जुलै 2021

ई काँमर्स, रेल्वे, बस, विमान तिकीटांची बुकिंग, मोबाईल, डीटीएच रिचार्ज यासारख्या सेवा तुम्हाला घरबसल्या सुरू करता येतात.

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांनी आपल्या गावी जाणे पसंद केले. काहींनी आपला व्यवसाय सुरू केला, तर काहींनी सेंद्रिय शेती सुरू केली. जर आपल्याही मनात अशाच विचार असेल की गावात जाऊन काहीतरी उद्योग-व्यवसाय सुरू करावा, तर केंद्र सरकारच्या या योजनेचा common service center आपल्याला नक्की फायदा होईल. या योजनेमुळे गावातच राहुनच आपल्याला प्रगती करता येईल. तुम्ही सुशिक्षित असाल आणि तुम्हाला तुमच्या गावी राहूनच काही करायचे असेल तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरू शकते. csc you can earn with a common service center what you need to know all steps

केंद्र सरकारची ही योजना डिजिटल इंडिया योजने अंतर्गत येते. डिजिटल इंडिया अंतर्गत तुम्ही तुमच्या गावात कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center) उघडून तुमचे उत्पन्न मिळवू शकता. यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला एक आँनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला त्याचे प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर तुम्हाला गावात काम सुरु करता येईल. यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. ग्रामीण युवकांना उद्योजक बनविणे आणि डिजिटल इंडियाचे फायदे गावा-गावात पोहचविणे हा उद्देश या योजनेचा आहे. csc you can earn with a common service center what you need to know all steps

आपल्याला जर संगणकाची माहिती असेल तर प्रथम register.csc.gov.inवर जाऊन काँमन सर्विस सेंटरसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी आपल्याला १,४०० रुपये शुल्क भरावे लागेल. नोंदणी करताना आपल्या सेंटर सुरु करण्याच्या जागेचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर एक क्रमांक मिळेल (आयडी) त्या आयडीवरुन तुम्ही पुढील प्रक्रिया करता येईल. या अर्जानंतर आपला प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्रामुळे आपल्याला अनेक सेवा करण्यासाठी परवानगी मिळेल. ही परवानगी सायबर कॅफे चालकांना मिळत नाही. 

या प्रमाणपत्रानंतर आपण आँनलाईन अभ्यासक्रम, बाजार समित्या, कृषी सेवा, ई काँमर्स, रेल्वे, बस, विमान सेवेचे तिकीटांची बुकिंग, मोबाईल, डीटीएच रिचार्ज यासारख्या सेवा तुम्ही घरबसल्या सुरू करता येतात. याशिवाय आपण पॅन कार्ड ते पासपोर्ट बनविणे अशी अनेक कामे या योजनेच्या माध्यमातून करता येतात. या कामासाठी सरकार तुमच्याकडून पैसे घेणार नाही. तुम्ही तुमच्या गाव-शहरानुसार कामाची किंमत ठरवू शकतात.
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख