पंढरपुरचा निकाल महाविकास आघाडीचे डोळे उघडणारा... - Criticism of BJP leader Prasad Lad over Pandharpur assembly result | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपुरचा निकाल महाविकास आघाडीचे डोळे उघडणारा...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

प्रसाद लाड यांनी  महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. आवताडे यांना १ लाख ०९ हजार ४५० मते मिळाली, तर भालके यांना १ लाख ०५ हजार ७१७ मते मिळाली आहेत. 

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय  मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी मतदारसंघात तळ ठोकूनही त्यांचा पराभव झाला आहे. या निकालाबाबत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी टि्वट करीत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

"पंढरपूर विधानसभेचा निकाल हा तर महाविकास आघाडीचे डोळे उघडणारा आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅाग्रेसचे सर्वच नेते, शिवसेनेचे मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहनत केल्यानंतरही भगीरथ भालके यांचा पराभव करून भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले. या निवडणुकीत प्रशांत परिचारक, उमेश परिचारक याचे मोठे योगदान आहे, त्याचे मी अभिनंदन करतो. हा विजय भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा आहे. हा पराभव महाविकास आघाडीतील भ्रष्टाचाराचा पराभव आहे. कोरोना रोखण्यास हे सरकार अपयशी ठरलं याचा ही हा पराभव आहे." असे टि्वट प्रसाद लाड यांनी केलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख