व्हिडिओ क्लिप व्हायरल..उपसभापतींसह 76 समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा..  - Crime against Deputy Chairman of Pandharpur Panchayat Samiti Rajeshri Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

व्हिडिओ क्लिप व्हायरल..उपसभापतींसह 76 समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

राजेश्री भोसले यांच्यासह त्यांच्या 76 समर्थक कार्यकर्त्यांवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापती राजेश्री भोसले यांच्यासह त्यांच्या 76 समर्थक कार्यकर्त्यांवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

राजेश्री भोसले यांची बुधवारी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ओझेवाडी या गावी वाजतगाजत जल्लोषात मिरवणूक काढली होती. 

मिरवणूकीत सोशलडिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आल्याने गर्दी करू नये, विनामास्क फिरू नये, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही शेकडो लोकांच्या उपस्थितीत नुतन उपसभापती राजेश्री भोसले यांची मिरवणूक काढून कोरोना नियमाना हरताळ फासल्याचे समोर आले आहे. 

उपसभापतींच्या मिरवणुकीची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर  पोलिसांनी रात्री उपसभापती राजेश्री भोसले, त्यांचे पती पंडीत भोसले यांच्यासह इतर 76 जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाने पिकवली अफू : पोलिसांंकडून गुन्हा दाखल
 
जालना : पिकात अफूची लागवड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाला जालन्यातील बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात शेतकऱ्यांने पिकात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची पाहणी केली असता पिकात अफूची लागवड केली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या शेतकऱ्यांच्या शेतातून ९६ किलो २०० ग्राम अफूची झाडे जप्त केली. या अफूची बाजारभावानुसार  किंमत २४ लाख ५ रूपये आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्यांच्या शेतातच अफू पिकवली जात असल्याने एकच खबळ उडाली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख