Corona Alert : कोरोना पोहचला जगातील सर्वात उंच शिखरावर

मागील वर्षभरापासून कोरोनाने जगातील बहुतेक सर्वच देशांना विळखा घातला आहे.
Covid reaches worlds highest mountain Everest
Covid reaches worlds highest mountain Everest

काठमांडू : मागील वर्षभरापासून कोरोनाने जगातील बहुतेक सर्वच देशांना विळखा घातला आहे. सध्या जगात सर्वाधिक रुग्ण भारतात आढळून येत आहेत. सध्या दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णसंख्या समोर येत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जगातील प्रत्येकी चार रुग्णांमागे भारतातील एक रुग्ण असल्याची स्थिती आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असले तरी अद्याप कोरोना विषाणू जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहचला नव्हता. पण या विषाणुने आता हे शिखरही सर केल्याचे स्पष्ट झाले. एका गिर्यारोहकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याला शिखराच्या बेस कँपवरून तातडीने हेलिकॅाप्टरद्वारे काठमांडूला हलविण्यात आले. 

बाधित गिर्यारोहक एर्लंड नेस हा नॅार्वे या देशातील आहे. त्याची कोरोना चाचणी 15 एप्रिल रोजी पॅाझिटिव्ह आली होती. तर गुरूवारी त्याची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या तो नेपाळमधील एका कुटूंबासोबत राहत आहे. पण एक गिर्यारोहक कोरोनाबाधित झाल्याने इतर गिर्यारोहक, गाईड व इतर सहकाऱ्यांमध्ये भिती पसरली आहे. 

याविषयी बोलताना एक गाईड म्हणाले, बेस कँपमधील सर्वांची तातडीने तपासणी न केल्यास विषाणुचा संसर्ग सर्वांमध्ये पसरण्याची भिती आहे. असे झाल्यास गिर्यारोहणाचा हा हंगाम बंद करावा लागेल. मे महिन्यात गिर्यारोहणासाठी चांगले वातावरण असते. पण त्याआधीच हे थांबवावे लागेल. त्यामुळे सर्वांची तातडीने चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाचे विलगीकरण करायला हवे. हे न केल्यास खूप विलंब होईल. बाधित गिर्यारोहक आठवडाभर इतर काही टीमसोबतच होता. 

दरम्यान, नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या शिखरावरही एकही कोरोनाबाधित नाही. माऊंटरिंग विभागाच्या संचालक मीरा आचार्य म्हणाल्या, आमच्याकडे शिखरावरील कोविड केसबाबत कोणतीच अधिकृत माहिती नाही. केवळ न्युमोनिया व इतर आरोग्य विषयक समस्या असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

मागील वर्षी कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर गिर्यारोहण बंद करण्यात आले होते. मे 2019 नंतर गिर्यारोहक पहिल्यांदाच एव्हरेस्टकडे परतले आहेत. नेपाळमधील गिर्यारोहणाचा हंगाम मार्चमध्ये सुरू होऊन मेमध्ये संपतो. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com