धक्कादायक : कुंभमेळ्यात एक लाखांहून अधिक कोरोना चाचण्या बोगस

देशात कोरोनाचा कहर वाढत असताना उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक सहभागी झाले होते.
Covid 19 Fake one lakh Corona test in Kumbha mela
Covid 19 Fake one lakh Corona test in Kumbha mela

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कुंभमेळ्यादरम्यान कोरोना चाचणीचा मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तब्बल एक लाखांहून अधिक बोगस चाचण्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा घोटाळा राज्यातील खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Covid 19 Fake one lakh Corona test in Kumbha mela)

देशात कोरोनाचा कहर वाढत असताना उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक सहभागी झाले होते. यावेळी कोरोना चाचण्या करण्यासाठी राज्य सरकारने 22 खासगी प्रयोगशाळांचे सहकार्य घेतले होते. याच प्रयोगशाळांनी घोटाळा केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हरिद्वार जिल्हा प्रशासनाला संबंधित प्रयोगशाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कुंभमेळ्यादरम्यान उच्च न्यायालयाने दररोज 50 हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिलं होतं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयोगशाळांनी एक लाक बोगस चाचणी अहवाल दिले आहेत, असे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. यामध्ये प्रयोगशाळांनी लोकांची ओळखपत्र आणि फोन नंबरच्या आधारे चुकीचे अहवाल दिले. प्रयोगशाळांनी एकूण 2 लाख 51 हजार 457 चाचण्या केल्या. त्यापैकी 2 लाख 7 हजार 159 अँटीजेन चाचण्या तर 44 हजार 278 RT-PCR चाचण्या होत्या. चाचण्या न करताच अहवाल दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अँटीजेन चाचण्यांमध्ये केवळ 1 हजार 23 लोकांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले. तर 50 हजारांहून कमी RT-PCR चाचण्यांमध्ये 1250 अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. इतर सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे आढळले आहे. चाचण्यांमधील बोगसपणा सिध्द करण्यासाठी लोकांची ओळखपत्र आणि चाचण्यांच्या अहवालांची पडताळणी करण्यात येणार आहे. 

उत्तराखंडमध्ये 1 ते 30 एप्रिल या कालावधीत कुंभमेळा पार पडला. यामध्ये सुमारे 70 लाख भाविकसहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हरिद्वार, डेहराडून आणि टेहरी या जिल्ह्यांमध्ये महा कुंभमेळा झाला. कोरोनामुळे कुंभमेळाच्या कालावधी कमी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कुंभमेळा प्रतिकात्मक व्हावा, असे आवाहन केले होते. कोरोना काळात कुंभमेळा आयोजित केल्यामुळं विरोधकांकडून सरकारवर टीकाही करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com