व्हेंटिलेटर आणि मोदी दोन्हीही कामात अपयशी..राहुल गांधींचा टोला - coronavirus rahul gandhi criticism pm modi and ventilators issued under pm cares fund | Politics Marathi News - Sarkarnama

व्हेंटिलेटर आणि मोदी दोन्हीही कामात अपयशी..राहुल गांधींचा टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

अनेक व्हेंटिलेटरमध्ये दोष आढळले आहेत, यामुळे ते वापराविना पडून आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असताना वैद्यकीय सुविधाची वानवा जाणवत आहे. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर, मेडिकल ऑक्सीजन यांचा तुटवडा जाणवत असताना पीएम केयर्स फंडमधून राज्यांना व्हेंटिलेटरचे ventilatorsवितरण नुकतेच करण्यात आले आहे. पण यातील अनेक व्हेंटिलेटरमध्ये दोष आढळले आहेत, यामुळे ते वापराविना पडून आहेत.  coronavirus rahul gandhi criticism pm modi and ventilators issued under pm cares fund

अनेक डॅाक्टरांनी हे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे सांगितले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या व्हेंटिलेटरवरुन  मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरीच समानता आहे.
 
ममता बॅनर्जी CBI वर भडकल्या..म्हणाल्या.."मला पण अटक करा.."

राहुल गांधी आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,  ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात. हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात.

काही दिवसापूर्वी भोपाल  येथे हमीदिया रुग्णालयात त्रुटीं असलेल्या व्हेटिंलेटर्सचे प्रकरणा समोर आले होते, या रुग्णालयातील डॅाक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून हे व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे कठिण असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथूनही अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. 

औरंगाबादमधील घाटी रुग्णालय आणि नाशिक महानगर पालिकेला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ''पीएम केअर फंडातून राज्यभरात पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करा'', अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती.
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख