मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत केलेले आवाहन जर जनता पाळत नसेल तर जबाबदारीने वागा. लाँकडाउन करण्याची वेळ आणू नका," असे व्यक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच केले आहे. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शेख यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबत टि्वट केलं आहे.
आपल्या टि्वटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, पालक मंत्री श्री अस्लम शेख असं म्हणाले की मास्क लावला नाही तर लॉक डाउन करावा लागेल. आमची त्यांना विनंती आहे हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वतःच्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी.
बुलढाणा, यवतमाळ, अमरावती येथे लाँकडाउन करण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर मुंबईतही लाँकडाउन होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना अस्लम शेख म्हणाले की, मुंबईतही कोरोनाचे रूग्ण वाढले तर लाँकडाउन करावे लागले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विेशेष लक्ष मुंबईकरांनी दिले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. नागरिक ऐकत नाही, म्हणून क्लब, हाँटेल यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. लोकल बंद होऊ नये, मुंबईत प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे अस्लम शेख यांनी सांगितले. कोरोना रूग्णांची संख्या वाढत राहिली तर, लोकलची संख्या कमी करावी, का, हाँटेल, खाऊ गल्ली बंद करायची का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे शेख यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंबईचे पालक मंत्री श्री अस्लम शेख असं म्हणाले की मास्क लावला नाही तर लॉक डाउन करावा लागेल. आमची त्यांना विनंती आहे हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वतःच्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 24, 2021
हेही वाचा : मराठा आरक्षणात सरकार आता न्यायालयात घेणार ही भूमिका...
मुंबई : येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने काल बैठक घेतली. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या सुनावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अॅड. अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

