कोरोना विशेष टास्क फोर्सचे प्रमुखच पॉझिटिव्ह 

राज्याच्या कोरोना विशेष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाच कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. संजय ओक यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला असल्याने चिंता वाढली आहे.
Dr.-Sanjay-Oak-2-f.
Dr.-Sanjay-Oak-2-f.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांच्या कोरोनासंदर्भात होणार्‍या बैठकांमध्ये उपस्थित राहणारे राज्याच्या कोरोना विशेष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाच कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ. संजय ओक यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला असल्याने चिंता वाढली आहे. 
 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाच्या वाढीची कारणे, रूग्णांचा मृत्यू या मागची कारणे शोधण्यासाठी आणि डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सची जबाबदारी राज्य सरकारने डॉ. ओक यांच्याकडे दिली होती. मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. राज्यातील संपूर्ण करोना परिस्थितीवर या टास्क फोर्सकडून लक्ष ठेवण्यात येत होते. 
डॉ. संजय ओक हे वीस दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी  प्रिन्स अली खान या रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. ओक यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.   

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्या कार्यालयातील शिपायालाही कोरोना झाला आहे. या शिपायाला ताप येत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा रविवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. हा शिपाई शनिवारपर्यंत कामावर येत होता. तो अनेक अधिकारी उपस्थित कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : कोरोना सेंटर गैरप्रकाराबाबत 'या' आमदाराचे लोकायुक्तांना पत्र 


मुंबई : गोरेगावच्या कोरोना सेंटर उभारणीतील गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अतिम साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे केली आहे. लोकायुक्त म. ल. ताहिलयानी यांना साटम यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. साटम यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी याबाबत काहीही कारवाई न केल्यामुळे आता साटम यांनी हे पाऊल उचलले आहे.  
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com