देशात 'लव जिहाद' नव्हे कोरोना हेच मुख्य संकट..राऊतांचा भाजपवर निशाणा - Corona is the main crisis in the country not love jihad Raut's target is BJP | Politics Marathi News - Sarkarnama

देशात 'लव जिहाद' नव्हे कोरोना हेच मुख्य संकट..राऊतांचा भाजपवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये अगोदर लव जिहादचा कायदा करा, त्या कायद्याच्या विचार करून महाराष्ट्रात कायदा करण्यात येईल

मुंबई : लव जिहाद बाबत आज शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लव जिहाद कायदा महाराष्ट्रात कधी लागू करणार, बाबत विरोधपक्ष विचारणे करीत आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथे लव जिहाद कायदा आहे, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार भाजप चालवित आहे. बिहारमध्ये अगोदर लव जिहादचा कायदा करा, त्या कायद्याच्या विचार करून महाराष्ट्रात कायदा करण्यात येईल."   

"पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लव जिहादचा मुद्या पुढे केला जात आहे. देशात लव जिहाद नव्हे कोरोना हे मुख्य संकट आहे, असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. विविध विषयांवरून सध्या भाजप राज्यात आंदोलन करीत आहेत, भाजपच्या या आंदोलनामुळे कोरोना रोखणार का वाढणार, हे लक्षात घेतले पाहिजे. भाजप नेत्यांना मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी मंत्र्यांना भेटले पाहिजे," अशी सूचना राऊत यांनी केली आहे.   

हेही वाचा : वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले...शिवसेनेचा भाजपला टोला 

मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात विविध विषयावरून भाजप आंदोलने करीत आहेत. रस्त्यावर उतरत आहे. यावरून शिवसेनेने भाजपला फटकारले आहे. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ”हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?” त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे. भाजपला महामारीची उपमा देत लोकांच्या जिवाशी का खेळता? असा सवाल शिवसेनेने केला आहे. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख