सरकारी घोळ; राज्यात सोळा दिवसांत वाढले कोरोनाचे 8 हजार मृत्यू...

राज्यातील प्रत्यक्ष मृतांची संख्या आणि शासकीय आकडेवारीमध्ये सुमारे 11 हजारांहून अधिक मृत्यूचा फरक असल्याचा आरोप केला जात आहे.
Corona Deaths increased by eight thousand in 16 days in Maharashtra
Corona Deaths increased by eight thousand in 16 days in Maharashtra

मुंबई : राज्यात कोरोना (Covid-19) विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील मृत्यूचा आकडा आधीच एक लाखाच्या पुढे गेला आहे. देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यातच मागील सोहळा दिवसांत राज्यातील मृतांचा आकडा तब्बल आठ हजाराने वाढला आहे. तांत्रिक घोळामुळे हा आकडा वाढला असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिलं आहे. (Corona Deaths increased by eight thousand in 16 days in Maharashtra)

राज्यातील प्रत्यक्ष मृतांची संख्या आणि शासकीय आकडेवारीमध्ये सुमारे 11 हजारांहून अधिक मृत्यूचा फरक असल्याचा आरोप केला जात आहे. सरकारनेच ही माहिती लपवली असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. पण ही तांत्रिक बाब असून सर्व जिल्ह्यांना ही माहिती अद्ययावत करण्याचा सुचना आरोग्य विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहे, असे आरोग्य सचिवांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे.  

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची  माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ  तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते.  रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मृत्यू लपवल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. कोरोनाशी संबंधित माहिती संकलित करण्याची पध्दत, प्रयोगशाळांकडून येणारी चाचण्यांची माहिती, रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया याची माहिती दिली आहे. साधारणपणे दर पंधरा दिवसांनी पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते, अशी स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलं आहे. 

राज्यात २६ मे ते १० जून या कालावधीत एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील ८ हजार ७४  मृत्यू अद्ययावत करण्यात आलेले आहेत. दैनंदिन प्रसिध्दीपत्रकामध्ये त्यानुसार नोंद केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सर्वाधिक 1522 मृत्यूचा आकडा गुरूवारी (ता. 10) रोजी अद्ययावत करण्यात आला आहे. 

सुधारित करण्यात आलेले मृत्यू

26-05-2021-    539
27-05-2021-    459
28-05-2021    -549
29-05-2021    -389
30-05-2021-    412
31-05-2021    -316
01-06-2021    -377
02-06-2021    -268
03-06-2021-    336
04-06-2021    -1088
05-06-2021    -441
06-06-2021    -385
07-06-2021    -186
08-06-2021-    407
09-06-2021    -400
10-06-2021    -1522
एकूण                  8074

Edited By Rajanand More 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com