कोरोनाने बिहारात फक्त 961 मृत्यू, महाराष्ट्रात 41 हजार मृत्यू , मोदींनी केली तुलना  - Corona compared only 961 deaths in Bihar, 41 thousand deaths in Maharashtra, compared to Modi | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाने बिहारात फक्त 961 मृत्यू, महाराष्ट्रात 41 हजार मृत्यू , मोदींनी केली तुलना 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे.

पाटणा : बिहारमध्ये फक्त 961 लोकांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जेथे कॉंग्रेसची सत्ता त्या महाराष्ट्रात 41 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. असे सांगत बिहार राज्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात आमच्या सरकारला यश आल्याचा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. कॉंग्रेस, भाजप, राजद, जेडीयू तसेच इतर लहानमोठ्या पक्षांची नेत्यांनी राज्य पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. तसेच सत्ताधारी जेडीयू-भाजप सरकारला विरोधीपक्षाचे नेते प्रश्‍नांचा भडिमार करून भंडावून सोडत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून जशास तशी उत्तरे दिली जात आहे. 

राज्यातील कोरोनाच्या मुद्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी टीका केली आहे. त्याला उत्तर देताना सुशील मोदी म्हणाले, की बिहारमधील विरोधीपक्षांकडे कोणता मुद्दाच नाही. आता ते काहीही आरोप करीत आहे. मुळात कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात नितीशकुमार सरकारला यश आले आहे असा दावाही त्यांनी केला.बिहारमध्ये फक्त 961 लोकांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जेथे कॉंग्रेसची सत्ता त्या महाराष्ट्रात 41 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

बिहारमध्ये दररोज एक लाख लोकांची दररोज टेस्ट केली जात आहे आणि बेड खाली पडले असा दावाही त्यांनी केला. 

हे ही वाचा 
कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांनाच 

नवी दिल्ली : कोरोना महामारीवर मात करणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल क्रमांकावर असला तरी यामुळे जीव गमावलेल्यांची संख्या देशात एक लाखावर पोचली आहे. कोविड-१९ विषाणूंचा सर्वाधिक आणि शब्दशः जीवघेणा फटका ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाच बसतो हे वास्तव अजूनही कायम आहे, याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज ट्‌विटद्वारे केला आहे. 

तरुणांमधील चांगल्या प्रतिकार क्षमतेमुळे कोरोनाचा प्रभाव त्यांच्यावर तुलनेने कमी जाणवला तरी त्यांनी ‘मी तरुण आहे म्हणून मला कोरोना संक्रमण होणार नाही,’ या भ्रमात बिलकूल राहू नये. मास्क-हात धुणे-सॅनिटायजर व सुरक्षित अंतरभान पाळणे ही पथ्ये त्यांनी कायम सक्तीने पाळावीत व चुकीच्या गैरसमजात राहून स्वतःला व दुसऱ्यालाही जिवाला धोक्‍यात ढकलू नये, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. 

आगामी थंडीच्या दिवसांत कोरोनाचा फुफुसांवरील हल्ला वाढू शकतो, असाही इशारा यंत्रणेने दिला आहे. दरम्यान, कोरोनाला हरविणाऱ्यांमध्ये जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त म्हणजे ६२,२७,२९५ भारतीय आहेत, याकडे आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. मागील पाच आठवड्यांत भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्याचेही सांगण्यात आले. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज ७२ लाखांवर तर मृतांचा आकडा १ लाख २० हजारांवर आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख