हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाही..भाजप खासदारांचे वादग्रस्त विधान

प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-26T084017.886.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-26T084017.886.jpg

भोपाळ : भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर  pragya thakur पुन्हा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. controversial statement of bjp mp pragya thakur on martyr hemant karkare

मालेगाव बॅाम्बस्फोट प्रकरणाविषयी बोलत असताना त्यांनी तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याविषयी व्यक्तव्य केलं. यापूर्वीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असे विधान केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे  यांच्याबाबत प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 

आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे प्रज्ञा यांनी यापूर्वी म्हटले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी अशाच प्रकारचे विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की आपण हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाही. त्याना त्यांच्या पापाची शिक्षा दहशतवाद्यांनी दिली.  हेमंत करकरे यांना केंद्र सरकारने अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे हे शहीद झाले होते.  तर खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 

हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त होऊ शकतील. परंतू, अस्सल देशभक्त काही वेगळा विचार करतात. त्यांनी (करकरे) माझ्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी माझे आचार्य-शिक्षक (स्कूल टीचर) आदींची बोटे आणि हाडे मोडली, तोडली. मला खोट्या प्रकरणात अडकवले, असे त्या म्हणाल्या.


आणीबाणीत सावकार रडकुंडीला आले होते आणि लाचखोरीलाही आळा बसला होता...
पुणे :  इंदिरा गांधी , Indira Gandhi यांनी ता. २५ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी Emergency लागू केली. देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण झाले. पत्रकार  कामिल पारखे यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com