सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ (व्हिडिओ) - Congress Workers Disrupted MahaVikasAghadi Campaign Meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ (व्हिडिओ)

विश्वभूषण लिमये
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर मध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्याने संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार सभेत गोंधळ घातला

सोलापूर :  पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर मध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्याने संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार सभेत गोंधळ घातला. अखेर गृहराज्यमंत्री सजेत पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

या प्रचाराच्या सभेसाठी आज महाविका आघाडीचे अर्धा डझन मंत्री सोलापूरात आहेत. या बैठकीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील,राज्यमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. मात्र स्टेज वरील बॅनर वरती काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा फोटो नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या,  त्यामुळे संपूर्ण सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला.

यावेळी सुशीलकुमार शिंदे,प्रणिती शिंदे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. एकूणच संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असताना राज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली,  त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी जाहीर माफी मागितली. सुशीलकुमार शिंदे साहेबांचा फोटो अनवधानानं राहिला मात्र  शिंदे साहेबांचा फोटो आमच्या हृदयामध्ये आहे, असे सांगत उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काँग्रेसने घातलेल्या या गोंधळामुळे महाविकास आघाडीमध्ये असणारी गटबाजी ही उघडपणे जाहीर झाली आहे, आता यांचे पारिणाम निवडणुक निकालावर कसे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख