मोदी सरकार, पूनावालांना धमक्या अन् न मागता दिलेली 'वाय' सुरक्षा...नेमका संबंध काय?

पूनावाला यांनी सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने वाय सुरक्षा दिली. त्यामागे काय कारण आहे?
 Narendra Modi, Other Poonawala, .jpg
Narendra Modi, Other Poonawala, .jpg

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पूनावाला यांनी सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने वाय सुरक्षा दिली. त्यामागे काय कारण आहे? असा सवाल करत केंद्राने पुरवलेली सुरक्षा पूनावाला यांची रेकी करत आहे काय?, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत. पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावे. पूनावाला यांनी सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या मागे काय दडलंय? हे केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.

शिरच्छेद करणारे कोण हे पुनावाला यांनी सांगावे, फोन करणारा कोणीही लहान माणुस नाही. आदर पुनावाला भारतात नसताना सुरक्षेची मागणी केली नसतांना त्यांना केंद्राने कोणत्या कारणांमुळे सुरक्षा दिली. याचा खुलासा केंद्र सरकाने केला पाहिजे, असे पटोले म्हणाले. आदर पुनावाला यांनी लंडनमध्ये टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धक्कादाय खुलासे केले होते. ते म्हणाले होते की मी भारतात जाणार नाही, परंतु त्यांनी मी पुन्हा येणार असल्याचे सांगितले आहे, याचे आम्ही स्वागत करतो, असेही पटोले म्हणाले.

पूनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी लसीकरणाचे काम भारतात करावे, असे सांगातनाच पूनावाला यांच्यासोबत काँग्रेस असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असेही पटोले यांनी सांगितले.

तसेच कोरोना व्हॅक्सिनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचे राजकारणआहे काय? केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे कोरोना वाढतो आहे मृत्यु वाढत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. रेमडेसिव्हिर बाबत भूमिका मांडली होती या बाबात बाहेर जाणारे रेमडेसिव्हिर थांबवले मात्र खुल्या बाजारात रेमडेसिव्हिर आणत नाही आहेत, देशात या अौषधाचा मोठ्याप्रमाणात काळाबाजार झाला याला केंद्र सरकार जबाबदार आहे.

अदर पूनावाला काय म्हणाले होते?

अदर पूनावाला यांनी टाईम्सला दिलेल्या एक मुलाखत धक्कादायक खुलासे केले होते. “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणेही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे,” असे पूनावाला यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com