पटोले म्हणाले, "मला खुर्चीचा मोह नाही, खुर्ची माझ्या मागे धावते.."  - Congress state president Nana Patole criticizes BJP Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

पटोले म्हणाले, "मला खुर्चीचा मोह नाही, खुर्ची माझ्या मागे धावते.." 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

"मला खुर्चीचा मोह नाही, खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या मागे धावत नाही, असे नाना पटोले म्हणाले.

कल्याण : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका कार्यक्रमानिमित्त कल्याण येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर देशात सत्ता बदलेल, असे चित्र निर्माण केलं जातंय, मात्र महाराष्ट्रातली सत्ता बदलणार नाही, असा आमचा पूर्ण विश्वास आहे," असे पटोळे यांनी सांगितले. 

"मला खुर्चीचा मोह नाही, खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या मागे धावत नाही, राज्यात काँग्रेसला एक नंबर वर आणून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एल्गार परिषदेतील वक्तव्याबाबत बोलताना पटोळे म्हणाले की, कुठल्याही धर्माबाबत कोणालाही टीका करण्याचा अधिकार नाही जे केले ते चुकीचे आहे याबाबत आम्ही तक्रार केली आहे. 

शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटीच्या ट्विट बाबत बोलताना पटोले यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष केलं. एक काळ असा होता की सेलिब्रिटींना भाई लोकांची भीती होती, आता सेलिब्रिटींनी ट्विट केले ते केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विट केल्याचा आरोप यावेळी केला. कालच्या दौऱ्यात अमित शाह यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना 2014 मध्ये मोदींचं सरकार सहा चाकी होतं, आत्ता एक एक चाक कमी होत चाललेत, बेइमानी कोण करतय हे देशातील लोकांना समजते, उद्धव ठाकरे यावर त्यांना उत्तर देतील अस सांगितलं. 

"सध्याचं तीन चाकी रिक्षाचं महाविकास आघाडी सरकारची तीनही चाके वेगवेगळ्या दिशेनं जात आहे. आम्ही तुमच्या रस्त्यात येणार ऩाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल केली होती. यावर पटोले बोलत होते. 
 
अमित शाह म्हणाले की राज्यात निवडणुकीत शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे हे निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार करीत होते. मुख्यमंत्रीपदावर मी कुठलीही चर्चा केली नव्हती. मी कधीही बंद खोलीत राजकारण केले नाही. पण सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना मूठमाती दिली. स्वार्थासाठी ते सत्तेत आले आहे.  

अमित शाह म्हणाले, "शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं उद्धव ठाकरे खोटं बोलत आहे. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. जनतेने जो भाजप- शिवसेना युतीला जनादेश दिला होता, या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला. निवडणुकीनंतर त्यांनी अपवित्र आघाडी केली. स्वार्थासाठी सरकार स्थापन झालं. ठाकरे म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे माणसं आहोत. बिहारमध्ये आम्हाला अधिक जागा मिळाल्या तरीही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला"

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख