सचिन वाझे, परमबीरसिंह यांचा 'डायरेक्टर' भाजपच!  

भाजपला ओबीसींविषयी राग आहे. यातूनच भुजबळ यांना दोन वर्षे शिक्षा झाली,
nana patole.jpg
nana patole.jpg

सातारा : ''भाजपच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात विरोधात ईडी लावली जात आहे. हे सर्व मॅनिक्युलेट केलेले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू असून हे आता सर्वांना सरावाचे झाले आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे,'' असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patoleयांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.   

विधानसभेत विरोधपक्ष नेते सचिन वाझे प्रकरणाची भूमिका ज्या पध्दतीने मांडत होते, त्याचवेळी आम्ही सांगितले होते, हे भाषण ठरवून केलेले आहे. निलंबित पोलिस आयुक्त सचिन वाझे, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा डायरेक्टरच भाजप आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.    

राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाने क्लिन चिट दिली आहे. याबाबत ते म्हणाले, ''मागासवर्गीय नेत्याने दिल्लीत सुंदर महाराष्ट्र सदनाची इमारत बांधली, पण भाजपला ओबीसींविषयी राग आहे. यातूनच भुजबळ साहेबांना दोन वर्षे शिक्षा दिली, बदनाम केले, मालमत्ता जप्त केली. यातून भाजप मागासवर्गीयाविषयी अत्याचार यातून दिसून आला. भुजबळ साहेब निर्दोष होते, म्हणून त्यांची मुक्तता दिली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जमीन गैरव्यवहाराविषयी नाना पटोले म्हणाले, ''हे सर्व ते भाजपमध्ये असताना झालेले आहे. पण तेही म्हणतात मी तसे केललं नाही. कोर्टात हे प्रकरण चालले मगच यातून काही तरी निष्पन्न होईल" 

''किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप होत आहेत. त्यांच्यात कोणी नाहीत का, ईडी व सीबीआय हे कसे पोपट झालेत हे लोकांच्या लक्षात आले आहे. मुकुल रॉय नावाचा टीएमसीचा खासदार होता. त्याला ईडीचा धाक दाखवून त्याला भाजपमध्ये नेले. त्यातून तो शुध्द झाला. तो आता चांगला माणूस झाला. भाजपमध्ये आला तर तो शुध्द होतो. त्यांच्या विरोधात पक्षात आला की तो अशुध्द होतो, अशी त्यांची भावना आहे,'' अशी खोचक टीका पटोले यांनी केली. 

गणराया माझ्यावर आलेले संकट नक्कीच दूर करेल,  मी वाईट काम केलेलं नाही
 सिंधुदुर्ग : राजकीय मंडळींनीही आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. शिवसेनेचे नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांनी हे कणकवली तालुक्यातील हरकुळ या त्यांच्या मूळ गावी बाप्पाच्या उत्सवासाठी आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी आज साध्या पध्दतीने बाप्पाचे स्वागत केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com