वंजारींना नागपूर, तर असगावकरांना पुण्यातून कॉंग्रेसची उमेदवारी  - The Congress nominated Abhijit Vanjari from Nagpur and Asgaonkar from Pune | Politics Marathi News - Sarkarnama

वंजारींना नागपूर, तर असगावकरांना पुण्यातून कॉंग्रेसची उमेदवारी 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

येत्या 1 डिसेंबर रोजी राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने उमेदवार निश्‍चित केले आहेत. 
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी वंजारी यांना कॉंग्रेस पक्षाने संधी दिली आहे. वंजारी यांच्याकडून या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजप कोणता उमेदवार देणार आहे, याकडे राजकीय धुरिणींचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाने जयंत असगावकर यांना तिकिट दिले आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख