सातव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार...अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर... - Congress MP Rajeev Satav Funeral at Hingoli | Politics Marathi News - Sarkarnama

सातव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार...अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 

हिंगोली : काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav)  यांचे रविवारी (16 मे) पुण्यात पहाटे निधन झाले. आज सोमवारी (17 मे) हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 
आज पहाटे सहा वाजल्यापासून नागरिकांनी सातव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहे.  अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत. Congress MP Rajeev Satav Funeral at Hingoli

राज्यातील मंत्री, सावत यांचे समर्थक, विविध पक्षांचे कार्यक्रते, पदाधिकारी येथे आले आहेत.  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी सध्या सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांचे काल पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने निधन झाले.  कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर काल संपली.कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळला होता. दीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने राजीव सातव यांनी काल अखेरचा श्वास घेतला.

राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख