विक्रमी लसीकरणाचा दावा खोटा ; मोदीजी, भारतीयांचे आयुष्य जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही!

लसीकरणाचा खोटा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सरकारने लोकांच्या जीवाशी खेळ केला,
Sarkarnama Banner - 2021-06-28T104604.564.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-28T104604.564.jpg

मुंबई  : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतील विक्रमी लसीकरणाच्या दावा नुकताच केंद्र सरकारने केला आहे. ''या दावा खोटा असून भारतीयांचे आयुष्य म्हणजे जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही, हे भाजपला दाखवून देण्याची गरज आहे, '' असा टोला गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील त्यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या आयुष्याशी खेळत खोटी आकडेवारी दिल्याची केली टीकाही त्यांनी केली आहे. Congress leader Sates Patil criticizes Narendra Modi
 
भारतीय जनता कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाशी लढत असताना केंद्र सरकार सर्वात मोठी लसीकरण मोहीम झाल्याचे खोटे दावे करण्यात मग्न होते. लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा खोटा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सरकारने लोकांच्या जीवाशी खेळ केला, अशी टीकाही त्यांनी केली. कोविड या जीवघेण्या साथीशी लोक लढत असताना मोहिमेच्या चार दिवस आधी केंद्राने त्यांना लसीपासून वंचित ठेवले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी विक्रम करण्यासाठी त्यापूर्वी भाजपशासित काही राज्यात लसीकरण कमी करण्यात आले, ही बाब लज्जास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

21 जून रोजी सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेच्या आधी काही दिवस केंद्राने भाजपशासित राज्यांमध्ये अत्यंत धीम्या गतीने लसीकरण मोहिम राबवली. त्यामुळे उरलेल्या लशी या एकदम मोहिमेच्या पहिल्या दिवशी लोकांना देऊन विक्रमी म्हणजे 86 लाख लोकांचे लसीकरण झाल्याचे डांगोरे केंद्राने पिटले. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या अशा आशयाच्या वृत्ताचा दाखला देऊन पाटील यांनी टिवट् केलं आहे.  

समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या यासंदर्भातील बातम्यांनुसार मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये 16 ते 21 जून या कालावधीत लसीकरण मुद्दाम कमी केले. या लशी वाचवून 21 जून ला विक्रम करण्याचा केंद्राचा डाव होती. मध्य प्रदेशात 13 ते 16 जून या चार दिवसांत सुमारे साडेतेरा लाख लशी देण्यात आल्या. मात्र त्यापुढील पाच दिवसांत म्हणजे 16 ते 20 जूनदरम्यान केवळ दीड लाख लशी दिल्या गेल्या. म्हणजेच या चार दिवसांमध्ये 12 लाख मात्र वाचवल्या गेल्या. त्याचमुळे लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 21 जून रोजी 16.9 लाख एवढ्या विक्रमी मात्रा संपूर्ण राज्यात दिल्या गेल्या, असेही पाटील यांनी दाखवून दिले.

याच बातमीचा हवाला देत पाटील यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “भारतीयांचे आयुष्य म्हणजे केवळ जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही, हे भारतीयांनी भाजपला दाखवून देण्याची गरज आहे, असे पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्या दिवशी विक्रमी म्हणजे 86 लाख लोकांना लशी दिल्या असे ट्वीट केले असले तरी हा एका दिवसातील लसीकरणाचा विक्रम नाही. चीनमध्ये तब्बल आठवडाभर रोज एक कोटींहून अधिक लोकांना लस दिली जात होती, असेही पाटील यांनी दाखवून दिले आहे.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com