फडणवीस यांच्यासारखी दुटप्पी व्यक्ती मी पाहिली नाही ! - Congress leader Bhai Jagtap criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

फडणवीस यांच्यासारखी दुटप्पी व्यक्ती मी पाहिली नाही !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

ओबीसी आरक्षण रद्द व्हायला भाजप जबाबदार आहे.

मुंबई  : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईतील नालेसफाई, महापालिकेचा कारभार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. महापालिकेच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली.  मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  Congress leader Bhai Jagtap criticizes Devendra Fadnavis

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला मात्र अडचणीत आणण्यासाठी पाऊले उचलली आहेत. ''मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत,'' असे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मालमत्ता कर वाढ, मुंबई महापालिका प्रभागांची फेररचना, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसाठी अनुदान, नालेसफाई या मुद्यावर आरोप करत सेनेच्या अडचणीत वाढ केली आहे. 

जगताप म्हणाले की, ओबीसी आरक्षण रद्द व्हायला भाजप जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस सारखा दोगला माणूस मी पहिला नाही. ते फडणवीस नसून 'फसवणीस' आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाजाची फडणवीस यांनी फसवणूक केली आहे. 'सत्ता द्या ओबीसींना आरक्षण देतो' असे देवेंद्र फडणवीस कसे म्हणू शकतात?

''पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. नालेसफाईसाठी १०० कोटी खर्च केले, तर मग हा पैसा गेला कुठे, यामधील जबाबदार कंत्राटदारांवर कारवाई करा. नालेसफाईचा अहवाल प्रसिद्ध केला पाहिजे, प्रशासनाने मुंबईकरांना लवकरच खड्डेमुक्त केलं पाहिजे,'' असे जगताप यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना नरेंद्र पाटलांचा सवाल, म्हणाले..
पंढरपूर : ''मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा नेत्यांमध्ये फूट पडलेली नाही, पण पुढे कोण येते हे महत्वाचे आहे. सत्ताधारी पक्ष यातून पाय काढतो आहे. तो कुणाच्या तरी मागे लपतो आहे. गेल्यावेळी मराठा क्रांती मोर्चा निघाला होता तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मोर्चात एकाच वेळी सहभागी झाले होते. पण आता या प्रश्नी सत्ताधारी पक्ष मोर्चा काढण्यासाठी बाहेर पडत नाही,'' असा आरोप  माजी आमदार,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज केला. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख