गडकरींच मी ऐकतो... ते माझं ऐकतात.. - Congress leader Ashok Chavan statement about bjp leader Nitin Gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

गडकरींच मी ऐकतो... ते माझं ऐकतात..

संतोष जोशी
रविवार, 24 जानेवारी 2021

" गडकरी आणि माझे संबध चांगले आहेत. ते राजकीय नाहीत, " असं वक्तव्य  अशोक चव्हाण यांनी केले आहे.

नांदेड : "भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माझे संबध चांगले आहेत. मी त्यांना मदत करतो ते मला मदत करतात मात्र, ते राजकीय नाहीत, " असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. गडकरींच मी ऐकतो ते माझं ऐकतात असं ही चव्हाण म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाच्या मराठवाड्यातील कामांच्या संदर्भ देत चव्हाणांनी हे वक्तव्य केले आहे. चव्हाण काल एका कार्यक्रमात बोलत होते.

आता आमची भाषणेही बदलली...
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत मनापासून आल्यामुळे चांगलाच फरक पडलाय.. आता आमच्या  भाषणांची पध्दतही बदलली आहे. असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. पुर्वी एकमेकांच्या विरोधात असताना भाषणातून आगपाखड करण्याची एकही संधी आम्ही सोडत नव्हतो.एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांना उद्देश्यून बोलत राज्यातील नेत्यांना आपण महाविकास आघाडी सोबत पाँझिटीव्ह असल्याचा मँसेज देण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला.

कपाळावरील हात घाम पूसण्यासाठी होता..
मिडीयात माझा कपाळावर हात ठेवलेला फोटो वारंवार वापरण्यात येतो...तो फोटो म्हणजे 'अशोक चव्हाण मुश्कील में'  नाराज, संकटात असल्याने नाही तर कपाळावरचा घाम पुसण्यासाठी होता असा खुलासा करत मिडीयानं अप्रत्यक्षपणे तो फोटो वापरु नये, असं सांगण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला. तो फोटो मीडियात वारंवार वापरत असल्याची खंत चव्हाण ही यांनी बोलून दाखविली. ते नादेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

हेही वाचा : "मला मुख्यमंत्री व्हायची घाई नाही..."  
नांदेड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. "मला मुख्यमंत्री व्हायची घाई नाही.." असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा व्यक्त केली होती, त्यानंतर चव्हाणांनी हे व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम चांगल सुरू आहे. विरोधकांचा डाव यशस्वी होणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे औरंगाबादच्या नामांतरावरुन काँग्रेस शिवसेनेत कसलेही टोकाचे मतभेद नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न तर चव्हाण करत नाहीत ना असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भोकर येथील विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते.

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख