'आई-मुलानं आपलं इमान चीनकडं गहाण ठेवलं..' भाजपचा काँग्रेसवर हल्ला - Congress conspiracy to overthrow Modi government | Politics Marathi News - Sarkarnama

'आई-मुलानं आपलं इमान चीनकडं गहाण ठेवलं..' भाजपचा काँग्रेसवर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

चीन आणि काँग्रेस मोदी सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहे, असे संबित पात्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन तणाव आणि देशाची अर्थव्यवस्था या विषयावर भाजप नेहमीचं काँग्रेसच्या निशाण्यावर असतो. काँग्रेस आणि विशेष करून राहुल गांधी हे नेहमीचं काँग्रेसवर याबाबत टिका करीत असतात. पण सध्या चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स् या वर्तमानपत्राने काँग्रेससमोर नवीन संकट उभं केलं आहे. ग्लोबल टाइम्सने आपल्या एका लेखात म्हटलं आहे की काँग्रेस भाजप सरकार पडण्याची वाट पाहत आहेत. याबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टि्वट केलं आहे. पात्रा यांनी टि्वटमधून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. चीन आणि काँग्रेस मोदी सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहे, असे संबित पात्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. 
  
ग्लोबल टाइम्सने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत विरोधी पक्षाची टिका झेलत आहे. भाजप सरकारला पाडण्याची संधी काँग्रेस शोधत आहे. यासाठी भाजप प्रशासन आणि त्यांचे परराष्ट्रीय धोरण यावर सातत्यानं काँग्रेस हल्ला करीत आहेत. 

ग्लोबल टाइम्सच्या या टि्वटमुळे काँग्रेसवर आता टिका होत आहे. यावर भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की आम्ही सांगितलं होत की 2008 मध्ये 'आई-मुलाने' यासाठीच चीनसोबत करार केला नव्हता. यामागे षडयंत्र असल्याचं आज उघड झालं आहे. आई-मुलानं आपलं इमान चीनकडं गहाण ठेवलं आहे. आज चीन आणि काँग्रेस मोदी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कालच काँग्रेसचे प्रवक्ता सुरजेवाला यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदीजी आणि सरंक्षणमंत्री राजनाथ सिंहजी देशाला विश्वासात घ्या. भारत चीनला कधी सडेतोड उत्तर देणार. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जीडीपी, अर्थव्यवस्था चीन-भारत संघर्ष यावरून मोदींना लक्ष्य केलं आहे.   

सीमेवरील संघर्षाला भारतच जबाबदार असून, एक इंचही भूमी भारताला देणार नाही, अशी आठमुठी भूमिका चीनने घेतली आहे. यावर भारतानेही चीनला खडे बोल सुनावले आहेत. चीनने ताबा रेषेचा आदर करावा आणि तेथील स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल करू नये, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावून सांगितले. 

राजनाथसिंह हे सध्या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला रवाना झाले असून, तेथेच त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये  लडाख भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. सीमेवरील कारवायांवरून राजनाथसिंह यांनी चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. चीनने सीमेवरील स्थिती काळजीपूर्वक हाताळावी, अन्यथा ती आणखी बिघडेल अशी कोणतीही पावले टाकू नयेत, असा इशारा त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना दिला. भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख