राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले 24 तासांत प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी : सहा कार्याध्यक्ष दिमतीला

काॅंग्रेसला आक्रमक चेहरा मिळाल्याची पक्षात प्रतिक्रिया...
Nana Patole-Rahul Gandhi
Nana Patole-Rahul Gandhi

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे नाना पटोले यांच्या नियुक्तीची घोषणा आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास करण्यात आली. त्यामुळे या पदावर नक्की कोणाची वर्णी लागणार याबाबतच्या अटकळी समाप्त झाल्या आहे. नाना पटोले हेच अध्यक्ष होणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त `सरकारनामा`ने दिले होते. राजीनामा दिल्यानंतर चोवीस तासांत नानांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. 

नानांनी कालच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देवून संघटनेत जाणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचित केले होते. नानांना मंत्रीमंडळात घेऊन प्रदेशाध्यक्षपदी इतर नेत्याला संधी मिळणार असल्याचे बोलण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. 

काॅंग्रेस पक्षाला 2009 मध्ये राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नानांची बंडखोर नेता अशी प्रतिमा आहे. ते भाजपकडून एखदा आमदार व खासदार झाले. पक्षसंघटनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळवणारे नाना हे राज्यातील आतापर्यंतचे एकमेव नेते ठरले आहेत. इतर पक्षांतून आलेल्यांना एक वेळ मुख्यमंत्री, मंत्री करतील पण पक्षाचा प्रदेशाध्यक्ष काॅंग्रेसमध्ये करणार नाही, हा समज पटोलेंच्या नियुक्तीने दूर झाला आहे.

पटोलेंना सहकार्य करण्यासाठी सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरीफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणीती शिंदे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे.

याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शिरीश चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवीन पार्लमेंटरी बोर्ड पुढीलप्रमाणे :

नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टिवार, डाॅ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजीत कांबळे, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दकी, अशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुशरफ हुशेन, मोहन जोशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com