कृषी विधेयकावरून कॉंग्रेस आक्रमक, पंजाबध्ये महामार्ग रोखला  - Congress aggressive on agriculture bill, blocked highways in Punjab | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी विधेयकावरून कॉंग्रेस आक्रमक, पंजाबध्ये महामार्ग रोखला 

वृत्तसंस्था
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कृषि विधेयकांवरून पंजाबातील शिरोमणी अकाली दलाने भाजपवर आरोप केला आहे. या पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कृषि विधेयकांवर कॉंग्रेसने आज शिरोमणी अकाली दलाला चिमटे काढले आहे. या पक्षाने यू-टर्न घेत शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांना सॅल्यूट करतो असे कॉंग्रेसचे पंजाबातील मंत्री बी.बी.आशू यांनी म्हटले आहे. 

तर दुसरीकडेसत्ताधारी पक्षाने विरोधीपक्षांवर टीका केली आहे. विरोधक शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्याला आपला कुठेही विकण्याची मूभा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊनही विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप हरियाणाचे कृषिमंत्री अनिल विज यांनी केला आहे. 

कृषि विधेयकांवरून पंजाबातील शिरोमणी अकाली दलाने भाजपवर आरोप केला आहे. या पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रतापसिंग बाजवा यांनीही केंद्राच्या कृषि विधेयकावर टीका केली आहे. हे विधेयक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आणि देशोधडीला लावणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे.

हे विधेयक येऊ नये म्हणूच आम्ही प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंजाबमधील युक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी दिल्ली आणि चंडीगड राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला. एकूणच मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाला विरोध वाढताना दिसत आहे. याबाबत सरकार कोणता निर्णय घेते याकडे देशाचे लक्ष आहे. 

शिवराजसिंह अन् जोतिरादित्यांना कमलनाथांचा मोठा धक्का
भोपाळ : मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका नोव्हेंबर अखेरीस बिहारच्या विधानसभा निवडणुकीसोबत होत आहेत. आता भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्याला फोडून त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिला दणका दिला आहे.  

भाजप नेते जोतिरादित्य शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख