काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ; दानवेंचा पुतळा जाळला

रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Sarkarnama (11).jpg
Sarkarnama (11).jpg

जालना : ''राहुल गांधी हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत,'' अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज जालन्यात रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस Congress कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

''रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का ?'' असा सवाल करत दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, या आंदोलनात मात्र आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या सह जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या जालना नगर परिषेदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता असतानाही नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.  

काल जन आशीर्वाद यात्रेत कैलाश गोरंट्याल सहभागीहून त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांचा सत्कार केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता, त्यात दानवे विरुद्ध आंदोलनात ही त्यांचा सहभाग दिसला नसल्याने चर्चला उधाण आलं आहे. 

वाझेला रोज दोन कोटीचं टार्गेट..पालिका कंत्राटदारांनाही केलं होतं लक्ष्य 
मुंबई : निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे sachin waje याला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांनी दररोज दोन कोटीचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा या प्रकरणातील तक्रारदारांने केला आहे. कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने हे नुकसान भरुन काढण्यासाठी वाझेने महापालिकेतील कंत्राटदारांनाही वाझेने लक्ष्य केलं असल्याचे तक्रारदारांने तपासात सांगितले आहे. 
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com