ममतांच्या विजयाने प्रादेशिक पक्ष आनंदले; शरद पवार, केजरीवाल, मेहबूबा मुफ्तींकडून कौतुकाचा वर्षाव - Congratulations to Mamata Banerjee from Sharad Pawar, Kejriwal, Mehbooba Mukti | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

ममतांच्या विजयाने प्रादेशिक पक्ष आनंदले; शरद पवार, केजरीवाल, मेहबूबा मुफ्तींकडून कौतुकाचा वर्षाव

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

प्रादेशिक पक्षांकडून ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले जात आहे. अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे ट्वीटद्वारे अभिनंदन केले आहे.  

नवी दिल्ली : पश्चीम बंगालच्या विधानसाभा नवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपवर चांगली आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०७ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. प्रादेशिक पक्षांकडून ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले जात आहे. अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे ट्वीटद्वारे अभिनंदन केले आहे.  

याच पार्श्वभूमीवर बंगालमध्ये आता तृणमूल सत्तेची हॅटट्रीक मारणार यावर केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असे समजले जात आहे. मतमोजणीचे आकडे समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे.  

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लाट कायम आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करत ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले आहे. शरद पवार म्हणाले, लोकांच्या भल्यासाठी तसंच कोरोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता दीदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. तसंच पश्चिम बंगालमधील जनतेचेही अभिनंदन केले आहे. काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ममता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर द्वेष पसरवण्याऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानले आहेत.

समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. ते ट्वीट कतर म्हणाल की ''पश्चिम बंगालमध्ये भाजप द्वेषाचे राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा'' असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.  

पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, तृणमूलने निर्णायक आघाडी घेल्यामुळे हा अंदाज फोल ठरतांना दिसत आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकत पणाला लावली होती. त्यासाठी भाजपने अनेक खासदारांनाही विधानसभा नवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मागील २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे वोट शेअर ४४.९ टक्के होता तर भाजपचा १०.२ टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला ३७.९ टक्के मते मिळाली होती तर इतरांच्या खात्यात ७ टक्के मते होती.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार असल्याचे सुरुतीच्या कलामध्ये दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख